ब्रेकिंग : जळगाव मध्ये दुसऱ्या दिवशीही एसीबी ची कारवाई, महिला अधिकाऱ्याला ५ हजारांची लाच घेताना अटक
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जळगाव एसीबीने काल बुधवार दि.२३ रोजी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल अधिकाऱ्याला लाच घेताना अटक केल्याची घटना ताजी असतांना आता जिल्हा परिषदेच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागातील जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या श्रीमती माधुरी सुनिल भागवत (वय ३८) यांना ५,००० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. हा प्रकार गुरुवारी (२४ जुलै २०२५) जळगाव येथे घडला.
अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार हे भौतिक उपचार तज्ञ तथा प्रभारी अधिक्षक वर्ग २ या पदावर शासकिय दिव्यांग समिश्र केंद्र, जळगांव या कार्यालयात कार्यरत असून, ते दि. १४.०७.२०२५ रोजी पगार बिलाच्या कामासंदर्भात जिल्हा दिव्यांग विभाग, जिल्हा परीषद कार्यालय, जळगांव येथे गेले असता, श्रीमती माधुरी भागवत, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी यांची भेट घेतली. त्यावेळी तक्रारदार यांचे जुन, २०२५ पगार बीलामध्ये काहीही त्रुटी न काढता पगार बीलाबर सहया करून ते पुढे जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांच्याकडे पाठवण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांच्याकडे १२,०००/- रू. लाचेची मागणी केली.
तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी दिनांक २२/०७/२०२५ रोजी ला.प्र.वि. जळगाव यांचेकडे लेखी तक्रार दिली होती. सदर तक्रारीप्रमाणे दिनांक २२/०७/२०२५ रोजी लाचपडताळणी केली असता, यातील श्रीमती माधुरी भागवत यांनी १०,०००/- रु. लाचेची मागणी करून, तडजोडीअती प्रथम हफ्ता म्हणून ५,०००/- रू.व उर्वरित ५,००० रुपये रक्कम इतर बिले निघाल्यावर दया, अशी पंचासमक्ष लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. आलोसे यांचे मागणीप्रमाणे दिनांक २४/०७/२०२५ रोजी श्रीमती माधुरी भागवत यांनी तक्रारदार यांचेकडून ५,०००/- रू लाचेची रक्कम स्वतः पंचासमक्ष स्वीकारली, म्हणून आलासे यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
या संदर्भात श्रीमती माधुरी सुनिल भागवत, वय ३८ वर्षे, धंदा नोकरी, (जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी), रा. पिंप्राळा, जळगाव. (मूळ पद वर्ग -०३ प्रभारी कार्यभार वर्ग- ०२) यांचे विरुद्ध जळगाव शहर पोस्टे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सदरची कारवाई पर्यवेक्षण अधिकारी श्री. योगेश ठाकूर,
पोलिस उप अधिक्षक,ला. प्र. वि. जळगांव. सापळा व तपास अधिकारी श्री. हेमंत नागरे,नपोलिस निरीक्षक ,
ला.प्र.वि. जळगांव./ सुरेश पाटील (चालक)पोहेकाँ/ श्रीमती शैला धनगर.पोकाँ/ प्रणेश ठाकूर.पोकाँ/ सचिन चाटे. यांनी केली.


