ब्रेकिंग : चेंगराचेंगरीनंतर महाकुंभ मेळ्यात पुन्हा भीषण आग
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात आज दुपारी पुन्हा आग लागली. आग विझवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे.
महाकुंभचा हा सेक्टर २२ परिसर झूसीच्या छतनाग घाट आणि नागेश्वर घाटाच्या मध्ये आहे. एका खाजगी कंपनीने उभारलेल्या वैदिक टेन्ट सिटी मध्ये आज दुपारी अचानक अनेक तंबूंनी पेट घेटला. या आगीत काही तंबू खाक झाले असून मात्र कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती आहे. अग्निशमन दलाला तात्काळ माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी युद्धपातळीवर आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
प्रयाग राज मधील महाकुंभ मध्ये काल दी. २९ बुधवार रोजी चेंगराचेंगरी झाली होती त्यात ३० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर ६० हून अधिक नागरिक जखमी झाले होते.
या पूर्वीही १९ जानेवारी रोजीही महाकुंभमध्ये आग लागली होती. सेक्टर १९ मधील गीता प्रेसच्या तंबूंना ही आग लागली होती. त्यावेळीही अनेक तंबू जळून खाक झाले होते. यावेळी सिलिंडर स्फोट झाला होता. त्यामुळे आग चांगलीच भडकली होती.
कुंभमेळा परिसरात ३५० हून अधिक अग्निशामक दल, ५० अग्निशामक केंद्रे, २० अग्निशामक चौक्या निर्माण केल्या असून २००० प्रशिक्षित मनुष्यबळ , तसेच रिंगण आणी तंबूत अग्निसुरक्षा उपकरणे बसविण्यात आली आहेत.