जळगाव

ब्रेकिंग : अज्ञात वाहनाने एकाच वेळी तीन मजुरांना चिरडले

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l अज्ञात वाहनाने जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावजवळील जळगाव खुर्द गावाच्या पुलाजवळ रात्री झोपलेल्या तीन परप्रांतीय तरुण लोखंडी पट्टीवर झोपलेले असताना तिघांना एकाच वेळी चिरडल्याची धक्कादायक घटना १० मार्च ते ११ मार्च च्या रात्री घडली. ही घटना मंगळवार ११ मार्च रोजी सकाळी उघडकीस आली.

मिळालेली अधिक माहिती अशी की, नशिराबाद गावाच्या पुढे असलेल्या जळगाव खुर्द गावाजवळील रेल्वे उड्डाण पुलाच्या बाजूला रोडचे काम सुरू असून या ठिकाणी परप्रांतीय मजूर काम करत असतात. मध्यरात्री हे परप्रांतीय मजूर रस्त्याच्या बाजूला झोपलेले असताना अंधारात काही न दिसल्याने अज्ञात वाहनाने तिघांना जागेवरच चिरडले आहे.

ही घटना ११ मार्च मंगळवार रोजी सकाळी ६ वाजता उघडकीला आली. नशिराबाद पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. नशिराबाद पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!