भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यमहाराष्ट्रसामाजिक

ब्रेकिंग :  कागदी, प्लास्टिक कप वापरावर बंदी! पेपर कपमधून चहा पिता? आता काचेच्या कपातच मिळणार चहा

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l कागदी, प्लास्टिक कप वापरावर बंदी आणणार असल्याचे संकेत दिले आहेत. आता ये पुढे काचेच्या कपातच चहा दिला जाणार आहे. चहाच्या टपरीवरील पेपर कप लवकरच बंद होणार आहेत.आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले. यापूर्वीही असा बंदीचा जीआर काढलेला आहे. तरीही या बाबत जनजागृती करून कागदी, प्लास्टिक कप बंद करणार असल्याचेही आरोग्य मंत्र्यांनी सांगितले.

 हमखास प्यायलं जाणारं गल्ली ते दिल्ली पर्यंतचं फेव्हरीट पेय चहा! हा चहाच दुर्धर आजारांचं कारण ठरू शकतो. पूर्वापार प्रत्येक घराघरात प्यायले जाणारे पेय म्हणजे चहा,   चहाच्या टपरीवर चहा प्यायला गेल्यावर पूर्वी आपल्याला काचेचे ग्लॅस किंवा काचेच्या कपमध्ये चहा दिला जात होता. पण आता या काचेचे ग्लॅस आणि कपची जागा प्लास्टिक आणि कागदी कपांनी घेतली आहे. यूज अँड थ्रो असलेले हे प्लास्टिक आणि कागदी कप वापरासाठी सोपे असले आणि त्यामुळे आपली मेहनत कमी होत असली तरी देखील हेच कप आपल्या आरोग्यासाठी खूपच घातक आहेत.

चहाचे कप बनविताना त्यामध्ये बीपीए नावाचे केमिकल वापरले जाते आणि हे केमिकल आरोग्याला हानिकारक असून त्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता आहे.

कागदी प्लास्टिक कप यासह प्लास्टिक वस्तूवर बंदीचा कायदा तर शासन प्रशासनाचे आदेश आहेच तरीही महाराष्ट्रात राजेरोसपणे चहाचे कागदी कप आणि प्लास्टिक द्रोण, पत्रवळ्या, प्लेट्सची विक्री आणि निर्मिती सुरू होती. बीपीए नामक केमिकल वापरणाऱ्या प्लास्टिकमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात कॅन्सर होत आहे. असंख्य नागरिकांचे जीव जात आहे. सदर गंभीर बाबीकडे

प्लास्टिक वितळल्यामुळे एकावेळी २५,०००  प्लास्टिकचे मायक्रोकन पोटात जात असल्यामुळे कॅन्सरचा आजार होण्याची दाट शक्यता आहे.

कागदापासून तयार केलेल्या डिस्पोजेबल कपमधून चहा पिणं हे आरोग्यासाठी हानिकारक असल्याची माहिती आता समोर आली आहे. एका रिसर्चमधून हो मोठा खुलासा करण्यात आला आहे.

आयआयटी खड़गपूर च्या संशोधकांनी केलेल्या रिसर्चमधून ही महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. जर एखादी व्यक्ती दिवसातून तीन वेळा पेपर कपमधून चहा पीत असेल, तर त्याच्या शरीरात प्लास्टिकचे ७५,०००  सूक्ष्म कण जातात असं रिसर्चमध्ये म्हटलं आहे.

मात्र पेपर कप तयार करताना वापरण्यात येणारे घटक हे हानिकारक असल्याची माहिती आता समोर आली आहे.रिसर्च करणाऱ्या आयआयटी खरगपूर येथील असोसिएट प्रोफेसर डॉ. सुधा गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, डिस्पोजेबल पेपर कपमध्ये असलेल्या प्लास्टिक आणि इतर हानिकारक पदार्थांमुळे गरम द्रव पदार्थ दूषित होत असल्याचं संशोधनात स्पष्ट झालं आहे.

पेपर कप तयार करण्यासाठी हायड्रोफोबिक फिल्मचा एक थर त्यात बसविला जातो. हा थर प्रामुख्याने प्लास्टिकचा बनलेला असतो. त्याच्या मदतीने, कपमधील द्रव टिकून राहते. मात्र गरम पाणी घालल्यानंतर १५  मिनिटांत हा थर वितळण्यास सुरुवात होते.

रिसर्चनुसार, ‘एका कपात फक्त १५  मिनिटांसाठी १००  मिली गरम द्रव पदार्थ (८५-९० ओसी) ठेवल्यास त्यात २५,००० मायक्रॉन आकाराचे (१० मायक्रोन ते १००० मायक्रोन) प्लास्टिकचे सूक्ष्म कण विरघळतात’

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!