ब्रेकिंग : सशस्त्र दरोडेखोरांच्या टोळीच्या भुसावळ पोलिसांनी आवळल्या मुसक्या, दरोडेखोर मध्यप्रदेश, भुसावळ व फैजपूर मधील असल्याचं आलं समोर
भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l भुसावळ मधून एक मोठी, तेव्हढीच धक्कादायक घटना समोर आली आहे. भुसावळमध्ये पोलिसांनी मोठी यशस्वी कारवाई केली आहे. धाडसी सशस्त्र दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या सात सदस्यांच्या टोळीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी चार जिवंत काडतुसे, दोन पिस्तूल, तलवारी आणि चाकू जप्त केले आहेत. विशेष म्हणजे ते आरोपी मध्य प्रदेश, खंडवा आणि फैजपूर येथील असल्याचे समोर आले आहे.
भुसावळ-नागपूर महामार्गालगत वाटर पार्क परिसरात सशस्त्र धाडसी दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळी कडून पोलिसांनी चार जिवंत काडतूस,
मॅकझिनसह दोन गावठी बनावटीचे पिस्तूल, पाच तलवारी, चार चाकू, एक फायटरसह मिरचीची पूड असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी सात संशयित आरोपींना अटक केली आहे. आरोपी हे मध्य प्रदेश, खंडवा, भुसावळ, फैजपूर येथील असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या या कामगिरीची पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.