ब्रेकिंग : रेल्वे तिकिटांचा काळा बाजार, दहा लाखांची तिकिटे जप्त, मलकापूर मधून दोघांना अटक
मलकापूर, जि. बुलढाणा. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | रेल्वे तिकिटांचा काळा बाजार करणारांचा पर्दाफाश करण्यात आला असून बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर मधून संजय चांडक आणि प्रसाद लाड या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या कडून दहा लाखांची तिकिटे जप्त करण्यात आली आहेत.
मुंबईमधून रॅकेट चालविणाऱ्या कुख्यात ठाकूर गँग शी दोघांचे कनेक्शन होतं. २२ मे रोजी मध्य रेल्वेच्या दक्षता विभागाला मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी दलालीच्या कामात सहभागी असलेल्या संजय चांडक आणि प्रसाद लाड या दोघांना प्रवासी आरक्षण केंद्र मलकापूर येथून ताब्यात घेण्यात आले असून या दोघांकडून रेल्वेचे १८२ तिकिटे जप्त करण्यात आली आहेत.