ब्रेकिंग : बॉलीवूड अभिनेत्यावर चाकू हल्ला, घरात घुसून केले सहा वार
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l मुंबईतून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर घरात घुसून रात्री अडीचच्या सुमारास चाकू हल्ला करण्यात आला असून सैफ अली वर सध्या लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सैफ अली खान याच्या वांद्रे (पश्चिम) येथील घरात घुसून एका अज्ञाताने हा हल्ला केल्याचे म्हटले जाते.
मिळालेल्या माहितीनुसार गेले काही दिवस तो चोर सैफ अली खानच्या घराची टेहाळणी करत होता. चोरीच्या उद्देशाने तो अज्ञात व्यक्ती अभिनेत्याच्या घरात शिरलेला असता त्याची चाहूल लागल्यामुळे घरामध्ये आरडा ओरड सुरू झाली. रात्री झोपले असताना अचानक आवाज झाल्याने त्यांनी बाहेर येऊन पाहिलं. तेव्हा चोर आणि सैफ अली खान एकमेकांच्या समोरासमोर आले. त्याचवेळी चोराने सैफ अली खानवर चाकूने वार केले. हा प्रकार रात्री अडीचच्या सुमारास घडला. त्यानंतर जखमी झालेल्या सैफ ला ताबडतोब मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. सैफ जखमी झाल्यामुळे त्याला सावरण्यासाठी घरात धावपळ सुरू झाली या संधीचा फायदा घेत चोराने घरातून पळ काढला.
सैफ याना सहा जखमा झाल्या असून दोन जखमा खोल आहेत, एक जखम पाठीच्या कण्या जवळ आहे. त्यांच्या गळ्याला १० सेमी ची जखम झाल्याचेही सांगितले गेले पोलिस चोराचा तपास करीत आहेत.