भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

ब्रेकिंग : लाचखोर तलाठी एसीबीच्या जाळ्यात, सात – बारा उताऱ्यावर नाव नोंदी साठी मागितली ५ हजारांची लाच

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l सात – बारा  उताऱ्यावर व स्लॅब  रजिस्टर वर नाव लावण्यासाठी जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील तलाठी नितीन शेषराव भोई, वय ३१ वर्षे, हा तलाठी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. उताऱ्यावर नाव लावण्यासाठी  पाच हजारांची लाच मागितली होती. या कारवाईने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

यातील तक्रारदार हे २६ वर्षीय जळगाव येथील पुरुष असून यांनी त्यांचे आई व भावाचे नाव ७/१२ उताऱ्यावर   व स्लॅब  रजिस्टर वर नाव लावण्यासाठी अर्ज केला होता. त्याबाबत तलाठी नितीन शेषराव भोई. यांनी ५०००/- रुपये लाचेची मागणी केली होती.त्याबाबत तक्रारदार यांनी आज दिनांक ०७/०१/२०२५  रोजी तक्रारदार यांनी  समक्ष लाप्रवि जळगांव यांना तक्रार दिली होती.

सदर तक्रारीची पंचासमक्ष लाच मागणी  पडताळणी केली असता पडताळणी कारवाई दरम्यान यातील तलाठी नितीन शेषराव भोई  यांनी ,७ -१२ उताऱ्यावर व स्लॅब रजिस्टर वर  नाव लावण्यासाठी  प्रथम ५०००/- ,४०००,/- रुपये  व तडजोडअंती ३००० /- हजार रुपयाची लाचेची मागणी करून लाचेची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर तलाठी नितीन शेषराव भोई, वय ३१ वर्षे, व्यवसाय नोकरी , तलाठी, नेम . सजा कुसुबा जि. जळगांव (  वर्ग ३ )
यांना आज दि. ०७/०१/२०२५  रोजी ३००० हजार  रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना रांगेहाथ पकडण्यात आले  असून  त्यांचेवर MIDC पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.

ही कारवाई सापळा पर्यवेक्षक अधिकारी योगेश ठाकूर, पोलीस  उपअधीक्षक, लाप्रवि जळगांव.
सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक, स्मिता नवघरे, Asi सुरेश पाटील चालक, पोना बाळू मराठे , पोकॉ अमोल सूर्यवंशी. यांनी केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!