ब्रेकिंग : लोकसभा निवडणुकीत सुमार कामगिरी केलेल्या आमदारांची उमेदवारी घोक्यात? भाजपची रात्री उशिरापर्यंत खलबत
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l भाजपची रात्री उशिरापर्यंत खलबत सुरू होती. गेल्या लोकसभा निवडणुकीत आमदारांच्या कामगिरीवर चर्चा करण्यात आली.लोकसभेत सुमार कामगिरी केलेल्या आमदारांची उमेदवारी धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लोकसभा निवडणुकीत ज्या आमदारांनी त्यांच्या मतदार संघात समाधान कारक कामगिरी केली नाही त्यांना विधान सभेची उमेदवारी नाकारण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते.
विधानसभेत भाजप १५० जागा लढविणार असल्याची माहिती मिळत आहे. लोकसभेत चांगली कामगिरी न करणाऱ्या आमदारांची तिकीट नाकारण्यात येणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळत आहे.
तसेच महायुतीच्या विद्यमान आमदारांच्या जागा त्याच पक्षाकडे राहणार असल्याचेही सांगितले गेले.तसेच अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे असलेल्या नाराजीवरही चर्चा करण्यात आली. येत्या विधानसभा निवडणुकीत कोणाची उमेदवारी कापली जाते व कोणाला उमेदवारी मिळते हे पाहण महत्वाचं आहे.