भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमप्रशासनमहाराष्ट्रराजकीय

ब्रेकिंग ! उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाचे आदेश

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l राज्याच्या राजकारणातली सर्वात मोठी खळबळजनक बातमी समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगला दिले आहेत. राज्यात मतदानाच्या शेवटच्या टप्प्याच्या मतदाना दिवशी उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगासह भाजपला टार्गेट केल्याची तक्रार भाजप नेते आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती.

२० मे ला मतदानादिवशी मतदान सुरू असताना पत्रकार परिषद घेतल्याने उद्धव ठाकरे यांना खूप महागात पडणार असल्याचे संकेत मिळाले होते. केंद्रीय निवडणूक आयोगाने या पत्रकार परिषदेची यासंदर्भात चौकशी करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले होते. उद्धव ठाकरेंची संपूर्ण पत्रकार परिषद निवडणूक आयोगाकडून तपासून पाहण्यात आली. यात काही वादग्रस्त असेल तर उद्धव ठाकरेंवर कारवाई करण्यात येणार असल्याचं संकेत देण्यात आले होते. त्या प्रमाणे केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!