ब्रेकिंग न्यूज : जळगाव जिल्हाधिकाऱ्यांसह काही पोलिस अधिकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह काही पोलिस अधिकाऱ्यांना अज्ञात व्यक्तीने मेलद्वारे जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
मेल द्वारे ही धमकी देण्यात आलीं असून त्यात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या सह काही पोलिस अधिकारी व मोठ्या व्यक्तीचे नाव सुद्धा असल्याचे पोलिस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मागील मार्च महिन्यामध्ये असे तीन चार मेल करण्यात आले आहेत. त्या पैकी काही एस पी ऑफिसला तर काही कलेक्टर ऑफिसला असे अलग अलग नावाने धमकीचे मेल पाठविण्यात आलेले आहेत. त्यात जिल्हाधिकारी यांच्यासह काही पोलिस अधिकाऱ्यांना मारू जळगाव मध्ये अशांती पसरवू अशा प्रकारचे मेल होते. त्यात एका मोठ्या व्यक्ती ला मारू असाही उल्लेख करण्यात आला असून ते मेल पाहता एकाच व्यक्ती कडून पाठविण्यात आल्याचे दिसून येत आहे. तसेच हे मेल कोणी पाठविले कुठून पाठविले याचा शोध घेतला जात आहे. असे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.