भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावभडगाव

ब्रेकिंग : जिल्हा हादरला..!हॉटेलात मोठा स्फोट १० ते १५ जण जखमी, जळगाव जिल्ह्यातील घटना

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जळगाव जिल्ह्यातील एका हॉटेलात मोठा स्फोट झाल्याने संपूर्ण परिसर हादरला. या घटनेत दहा ते पंधरा जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. ही घटना जळगाव जिल्ह्यातील भडगाव शहरात घडली .हा स्पोट इतका मोठा होता की त्या मुळे आजू बाजूचा परिसर हादरला.

हा कानठळ्या बसविणारा आवाज इतका मोठा होता की या स्फोटाने परिसरात घबराट पसरली. मात्र स्फोटाचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नसले तरी डी फ्रीज चा स्पोट झाल्याची माहिती मिळत आहे. या स्फोटातील जखमींवर भडगाव पाचोरा येथे उपचार सुरु आहेत.

भडगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या नवी मिलन हॉटेल मध्ये अचानक स्फोट झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.या स्फोटात या हॉटेलात चहा पिण्यासाठी बसलेले दहा ते पंधरा ग्राहक जखमी झाले. या स्फोट इतका मोठा होता की संपूर्ण परिसर हादरुन गेला. त्यामुळे या परिसरात काही वेळ गोंधळ उडाला. कोणाला काय झाले हे नेमके समजेना. जखमींना विविध वाहनांतून पाचोरा व जळगाव येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले.

हा स्फोट नेमका कशाचा याचा उलगडा अद्याप झालेला नाही. पोलिस या घटनेचा तपास करत आहेत. हा स्फोट गॅस सिलींडरचा की फ्रिजच्या कॉम्प्रेसरचा यावरुन संशय व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि परिस्थितीचा आढावा घेतला.नदरम्यान, स्फोटाचे कारण स्पष्ट झाले नसून काहींच्या मते हा स्फोट सिलेंडरचा तर काहींच्या मते फ्रीजच्या कॉम्प्रेसरचा स्फोट असावा अंदाज व्यक्त केला जात आहे.पोलिस, अग्निशमन दल घटना स्थळी पोहोचले असून प्रशासनाकडून तपास सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!