भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

ब्रेकिंग : महाराष्ट्रात भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l आज सकाळी ७.१५ वाजेच्या सुमारास महाराष्ट्र राज्यातील मराठवाड्यात भुकंपाचे हादरे बसल्याची बातमी समोर येत आहे. मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यासह परभणी, वाशिम, नांदेडमध्ये भूकंपांचे धक्के बसले असून आज सकाळी सातच्या सुमारास हा भुकंप झाला. आखाडा बाळापूर हे भूकंपांचे केंद्र होते. ४.५ रिश्टर स्केलची नोंद झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज दि.१० रोज बुधवार रोजी मराठवाड्यात ३ ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. यात हिंगोली जिल्ह्यासह परभणी, वाशिम, नांदेडमध्ये भूकंपांचे धक्के बसले आहेत. आखाडा बाळापूर हे भूकंपांचे केंद्र असून सकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान भूकंपाचे केंद्रबिंदू आखाडा बाळापूर पासून १३ किमी असल्याचे सांगितले जात आहे. वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गाव आणि परिसरात नेहमीच जमिनीत गूढ आवाज येत असतात. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही. या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

मराठवाड्यात विवीध ठिकाणी भुकंपाचे धक्के.     परभणी जिल्ह्यातील सेलु, गंगाखेड आदी भागात भुकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पुढ भुकंपाचा धक्का जाणवताच न घाबरता तात्काळ घराबाहेर पडून मोकळ्या जागेवर थांबावे असा सल्ला प्रशासना कडून देण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!