ब्रेकिंग : शालेय पोषण आहाराच्या पाकीटात मेलेला उंदीर सापडल्याने खळबळ, जळगाव जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार
जळगाव, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l. विद्यार्थ्यांचं बालवयातच आरोग्य चांगलं राहून त्याच पोषण व्हावं म्हणून शासनाने पौष्टिक शालेय पोषण आहाराची शाळेत चिमुकल्यांना वाटप करण्याची सुरुवात केली .राज्यातील सर्व शाळांमध्ये पोषण आहार योजना सुरू करण्यात येऊन पोषण आहार वाटप केला जातो. या दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात मोठा अनागोंदी कारभार सुरू आहे. हा आहार शारीरिक पोषणासाठी दिला जातो. मात्र या पोषण आहाराने मुलांचे/विद्यार्थ्यांचे शारीरिक पोषण होण्या ऐवजी शारीरिक नुकसान होण्याचा प्रकार जळगाव जिल्ह्यात घडला.
कारण, जळगाव जिल्हामध्ये मुलांच्या मध्यान्न भोजनामध्ये चक्क मेलेला उंदिर आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथील अंगणवाडीत नेहमीप्रमाणे मुलांना पोषण आहाराचे पाकिटे वाटप केली गेली. आपल्या चिमुकल्याला मिळालेल्या पोषण आहाराचे बंद पाकीट तेजस्वी देवरे या गृहिणीने स्वयंपाकादरम्यान उघडलं.मात्र बघते तर काय, त्या बंद असलेल्या मिक्स तांदळाच्या पाकीटातील दृश्य पाहून तिच्या पायाखालची वाळूच सरकली, गृहिणी गोंधळून गेली. काय तर चिमुकल्याच्या खाऊत चक्क मेलेले उंदराचे पिल्लू. सदरची घटना परिसरात वाऱ्यासारखी पसरली. या प्रकाराने पालकांमध्ये मोठ्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात असून पोषण आहाराच्या पाकिटामध्ये मेलेला उंदीर आढळल्याने प्रशासनाचा अनागोंदी व बेजबाबदार कारभार उघडकीस आला आहे.
ही घटना पहिलीच नव्हे..
शालेय पोषण आहारात मेलेला उंदीर सापडणं,ही घटना काही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही अशाच अनेक घटना समोर आल्या आहेत. या पूर्वी पोषण आहारात झुरळ, पाली, अळ्या, हे लहान कीटक,प्राणी सापडलेत. इतकेच काय तर साप, चिमणी ही मेलेले सापडल्याची उदाहरणे आहेत. मात्र आता तर थेट मेलेला उंदिर सापडल्याने पालकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे.