ब्रेकिंग : वाहनांसाठी फास्ट-टॅग अनिवार्य, फडणवीस सरकारचा निर्णय
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l चार चाकी वाहनांसाठी वापरले जाणारे फास्ट स्टॅग संदर्भात एक महत्त्वाचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला. १ एप्रिल पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. त्या मुळे या दिवसापासून राज्यातील सर्व वाहनांसाठी फास्ट टॅग बंधनकारक राहणार आहे.
टोल नाक्यांवर गाड्यांसाठी लागणारा वेळ आणि ट्रॅफिकची समस्या टाळण्यासाठी हा निर्णय सक्तिचा करण्यात आला आहे. आज ७ जानेवारी रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
जर तुमच्याकडे FASTag नसेल, तर तुम्हाला टोल टॅक्सच्या दुप्पट रक्कम भरावी लागेल. याचाच अर्थ जर फास्टॅग टोल ९० रुपये असेल, तर तुम्हाला पासशिवाय १८० रुपये भरावे लागतील. या निर्णयामुळे वाहनधारकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.