भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममुक्ताईनगर

मोठी बातमी : मुक्ताईनगर नगरपंचायतीत ‘बनावट बिल घोटाळा’! लाखोंच्या भ्रष्टाचार , शिवसेनेची कारवाईची मागणी

मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज,अक्षय काठोके |मुक्ताईनगर नगरपंचायतीत घरपट्टी व पाणीपट्टी वसुलीच्या नावाखाली बनावट बिल बुके छापून लाखोंचा घोटाळा झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याबाबत शिवसेना शहरप्रमुख प्रशांत टोंगे यांनी सविस्तर चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारीद्वारे केली आहे.

ठळक मुद्दे :
घरपट्टी व पाणीपट्टीची बनावट बिल बुके छापल्याचा आरोप

कुंपणच शेत खातेय! नगरपंचायतीतील कर्मचाऱ्यांचा संगनमताने घोटाळा
नागरिकांकडून कर घेतल्यानंतरही थकबाकी दाखवली जात असल्याने संताप

प्रभारी मुख्याधिकाऱ्यांच्या काळात वाढले मनमानी कारभार
तक्रारींच्या आधारे चौकशीची मागणी शिवसेनेचे प्रशांत टोंगे यांची जोरदार मागणी

सविस्तर बातमी :
मुक्ताईनगर नगरपंचायत कार्यालय हे शहरातील घरपट्टी व पाणीपट्टी वसुली करून त्या माध्यमातून नफा फंडातून कार्यालयीन खर्च, कर्मचाऱ्यांचे वेतन व विविध उपक्रम राबवते. मात्र सध्या येथे “कुंपणच शेत खातंय” अशी स्थिती निर्माण झाली असून, नागरी सेवेसाठी असलेली यंत्रणा स्वतःच भ्रष्ट मार्गाने पैसे लुटत असल्याचा आरोप शिवसेनेने लावला आहे.

प्रशांत टोंगे यांच्या म्हणण्यानुसार, नगरपंचायत कर विभागातील कर्मचाऱ्यांनी संगनमताने अधिकृत पावती न देता बनावट पावत्या देण्यात आल्या. परिणामी नागरिकांनी कर भरल्यानंतरही त्यांच्या खात्यावर तीच थकबाकी दाखवली जात आहे. अनेक नागरिकांनी ही तक्रार स्वतः टोंगे यांच्याकडे केल्याने, त्यांनी ही गंभीर बाब मुख्याधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली.

टोंगे यांनी म्हटले की, “नगरपंचायतीचा कारभार हा प्रभारी मुख्याधिकाऱ्यांकडे असून, त्यांच्या दुर्लक्षामुळे कर्मचाऱ्यांनी मनमानी कारभार सुरु केला आहे. बनावट बिल बुके छापण्यासारखा प्रकार म्हणजे थेट सरकारी महसुलावर डल्ला मारण्यासारखा आहे.”

शेवटी नागरिकांचा सवालकर भरूनही थकबाकी कशी?
या प्रकारामुळे शहरातील करदात्यांमध्ये प्रचंड संताप असून, त्यांनी भरलेल्या कराची नोंद नसल्याने विश्वासघात झाल्याची भावना व्यक्त केली आहे. एकीकडे प्रशासन नागरिकांकडून वेळेवर कर भरण्याची मागणी करतंय, तर दुसरीकडे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संगनमतामुळे सामान्य नागरिक आर्थिक फसवणुकीचा बळी ठरत आहेत.

शिवसेनेची मागणी : सखोल चौकशी व दोषींवर कठोर कारवाई करा
प्रशांत टोंगे यांनी तक्रारींच्या आधारे संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करून, दोषींना तत्काळ निलंबित करून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाची गंभीरता पाहता, नगरविकास विभागानेही लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!