ब्रेकिंग : सावदा बनावट नोटा प्रकरणातील, “तिसरा मास्टर माइंड” याच्या घरातून पुन्हा ” दहा हजाराच्या” बनावट नोटा हस्तगत .! रॅकेट चा पर्दाफॉश होणार?
सावदा, ता. रावेर. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l सावदा शहरातील ख्वाजा नगर मधील शेख आरिफ शेख फारुख व अझरखान अय्युब खान या दोघांना अटक करून त्याच्या कडून १०० रुपयांच्या ७६ बनावट चलनी नोटा १३ डिसेंबर शुक्रवार रोजी जप्त केल्या होत्या, तिसरा आरोपी हा भुसावळ येथील असल्याने या प्रकरणाचे धागेदोरे भुसावळ पर्यंत गेल्याचे निष्पन्न झाले . या दोघांना बनावट नोटा विक्री करणारा मेन डीलर तिसरा आरोपी ‘ आवेश ‘ भुसावळ येथील असल्याने त्यालाही अटक आले. आवेश च्या भुसावळ येथील राहत्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरातून पुन्हा दहा हजारांच्या बनावट चलनी नोटा जप्त करण्यात आल्या.
दरम्यान, तिसरा आरोपी आवेश यास दि १६ रोजी भुसावळ येथील त्याच्या गौशिया नगर मधील राहत्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरातून पुन्हा १०,००० रु च्या बनावट नकली नोटा हस्तगत करण्यात आल्या ने मोठी खळबळ उडाली आहे. मात्र सदर नोटा त्याने कोठून आणल्या, नोटा कोठे मुद्रित केल्या, त्याच्या मागे आणखी कोण कोण आहे, याचा मुख्य सुत्रघार कोण? बनावट चलनी नोटा सावदा – भुसावळ भागात सापडल्याने चलनात आल्या तर नसाव्यात याचा तपास होणे महत्वाचे असून बनावट नोटा प्रकरणातील रॅकेट चा पार्दाफॉश करण्याची मागणी केली जात आहे.