ब्रेकिंग : बनावट विमल गुटखा बनविणाऱ्या कारखान्यावर छापा, मशिनरी सह लाखोंचा कच्चा माल जप्त
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l गुटखा खाणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्यात प्रतिबंधित असलेला लाखो रुपयांचा बनावट विमल गुटखा बनविणाऱ्या कारखान्यावर छापा टाकण्यात आला असून या ठिकाणाहून मशिनरी व लाखो रुपयांचे बनावट विमल गुटखा बनविण्याचे साहित्य व मशिनरी जप्त करण्यात आले आहे. या ठिकाणी पुड्यांची पॅकिंग केली जातं होती. शिर्डी स्थानिक गुन्हे शाखे कडून ही कारवाई करण्यात आली आहे. या मुळे श्रीरामपुर शहर पोलिसात कर्तव्यावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे.
शिर्डी येथे श्रीरामपुर एम आय डी सी बनावट विमल गुटखा बनविणाऱ्या कारखान्यावर अहमदनगर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकण्यात आला असून यात तीन लोकांना ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
तसेच हा बनावट विमल गुटखा महाराष्ट्रात कोठे कोठे पुरविला जात होता तसेच या बनावट गुटख्यात कोणकोणते पदार्थ टाकले जातं होते या बाबतही माहिती घेतली जात आहे.