क्राईमजळगावपारोळा

ब्रेकिंग : ४० हजारांची लाच भोवली, महिला सरपंच, पती, व मुलांसह सेतू चालक जळगाव एसीबी च्या जाळ्यात

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l विद्यमान महिला सरपंच, तिचा पती, मुलगा आणि सेतू सुविधा केंद्र चालक अशा चारही जणांना ४० हजार रुपयांची लाच घेताना पकडल्याने जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ही घटना जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील मेहु गावात घडली.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार हे सन 2017-18 ते सन 2022- 23 मध्ये पारोळा तालुक्यातील मेहू गावाचे सरपंच होते. त्या दरम्यान ग्रामपंचायत मेहु यांनी मेहु गावात व्यायाम शाळा बांधण्यासाठी काम दिले होते. सदर व्यायामशाळा बांधकाम करण्यासाठी जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय जळगांव यांच्या मार्फतीने 7,00,000/- रु निधी ग्रामपंचायत मेहु यांनी मंजुर केला होता. त्यानंतर सन 2023 मध्ये जिजाबाई गणेश पाटील ,वय 43 वर्ष , व्यवसाय सरपंच , मेहु ता पारोळा जि.जळगाव. यांची मेहु गावाचे लोकनियुक्त सरपंच म्हणून निवड झाली आहे. त्यानंतर तक्रारदार यांनी सरपंच जिजाबाई पाटील. यांना व्यायाम शाळेच्या मंजुर निधीची मागणी संबंधित construction कंपनी च्या वतीने केली असता जिजाबाई पाटील यांनी त्यांना प्रथम 4,00,000/- रु चा धनादेश संबंधित कंपनीच्या नावाने दिला व उर्वरित 3,00,000/- रू रक्कमेचा धनादेश देण्याच्या मोबदल्यात जिजाबाई पाटील यांनी दि.31-01-2025 रोजी तक्रारदार यांच्या कडून 1,00,000, 70,000/- रू लाचेची मागणी केली .

त्या नंतर गणेश सुपडू पाटील ,वय 55 वर्ष शेती. तिन्ही रा. मेहु ता. पारोळा जि. जळगांव ( सरपंच पति) यांनी तडजोडीअंती 40,000/- रु लाच रक्कम मागितली.सदर लाच रक्कम देण्यास शुभम गणेश पाटील( देवरे) , वय 26 वर्ष शिक्षण ( सरपंच यांचा मुलगा ) यांनी प्रोत्साहन देऊन आज रोजी शुभम गणेश पाटील यांच्या सांगण्यावरून समाधान देवसिंग पाटील वय 35 वर्ष, व्यवसाय- खाजगी सेतु सुविधा केंद्र रा. बोदडे ता पारोळा . यांनी ४० हजार रुपये लाच रक्कम स्वीकारली.

यासंदर्भात पारोळा पोलीस स्टेशन ला 1) जिजाबाई गणेश पाटील ,वय 43 वर्ष , व्यवसाय सरपंच , मेहु ता पारोळा जि.जळगाव.
2) शुभम गणेश पाटील( देवरे) , वय 26 वर्ष शिक्षण ( सरपंच यांचा मुलगा )
3) गणेश सुपडू पाटील ,वय 55 वर्ष शेती. तिन्ही रा. मेहु ता. पारोळा जि. जळगांव ( सरपंच पति)
4) समाधान देवसिंग पाटील वय 35 वर्ष, व्यवसाय- खाजगी सेतु सुविधा केंद्र रा. बोदडे ता पारोळा .
या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू  आहे.

ही कारवाई पर्यवेक्षण अधिकारी योगेश ठाकूर, पोलीस उपअधीक्षक , लाप्रवि जळगांव. सापळा अधिकारी व तपास अधिकारी, श्रीमती नेत्रा जाधव. पोलीस निरीक्षक ला प्र.वि जळगाव, GPSI दिनेशसिंग पाटील, GPSI सुरेश पाटील, पोकॉ राकेश दुसाने, पोकॉ अमोल सुर्यवंशी यांनी केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!