ब्रेकिंग : पाच हजारांची लाच ; अव्वल कारकून एसीबीच्या जाळ्यात
जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l शासकीय गोदामा मधील अतिरिक्त दिलेल्या बारदानाच्या मोबदल्यात ५ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या एरंडोल येथील अव्वल कारकून व खाजगी पंटरला जळगाव लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडुन अटक केली.
यासंदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील रहिवासी असलेल्या तक्रारदार याना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शासकीय गोदाममधून बारदान विकत घेण्याचा कंत्राट मिळाला असून एरंडोल येथील शासकीय गोदामचे कीपर अव्वल कारकून नंदकिशोर रघुनाथ वाघ वय-४७, रा. एरंडोल यांनी तक्रारदार यांना कंत्राटीप्रमाणे नेमून दिलेल्या बारदान गोडाऊनमधून उचलल्यानंतर अतिरिक्त ७०० नग बारदान त्यांना इच्छा नसताना दिले व त्याच्या मोबदल्यात ७ हजार रुपयांची मागणी केली, असे न केल्यास तुझा कंत्राट रद्द करू आणि भविष्यात तुला कंत्राट मिळू देणार नाही असा दम दिला.
तक्रारदार याना कारकुनास लाच द्यायची नसल्याने त्यांनी जळगाव येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागा कडे तक्रार केली असता त्या तक्रारी नुसार पथकाने बुधवारी १३ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता पडताळणीसाठी सापळा रचला. त्यानुसार तडजोडीअंती ५ हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना संशयित आरोपी नंदकिशोर रघुनाथ वाघ वय-४, रा.एरंडोल आणि खाजगी पेंटर हमजेखान मेहमूद खान पठाण वय-३९, रा. एरंडोल या दोघांना अटक केली. याप्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, पोलीस उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील, राकेश दुसाने यांच्या पथकाने केली.