भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमचाळीसगावजळगाव

ब्रेकिंग : भाजपच्या माजी नगरसेवकार प्राणघातात हल्ला, जळगाव जिल्ह्यात खळबळ

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | जळगाव जिल्ह्यात भाजपच्या माजी नगरसेवकावर प्राणघातक हल्ला झाल्याने जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावात भाजपच्या माजी नगरसेवक नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर धारदार कोयत्याने वार करून प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात प्रभाकर चौधरी मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्यामुळे ते गंभीररित्या जखमी झाले आहेत. पुढील उपचारासाठी त्यांना धुळे येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रात्री वैष्णवी साडी सेंटर जवळ काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना अडवून त्यांच्यावर धारदार कोयत्याने वार केले. रात्री उशिरापर्यंत पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते तसेच पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळ्या भागांमध्ये पथके रवाना केली आहेत. हा हल्ला कुणी आणि का केला? यामागच कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

प्रभाकर चौधरी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा जिल्हा भाजपाकडून तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला असून या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.दोन दिवसांपूर्वीच मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते प्रभाकर चौधरी यांच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!