आरोग्यरावेर

ब्रेकिंग : रावेर तालुक्यातही जीबीएस सदृश्य रुग्ण, परिसरात खळबळ

रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील एका गावात एका २२ वर्षीय तरुण रुग्णाला जिबीएस सदृश्य लक्षणे आढळून आल्याने तालुक्यासह परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेने आरोग्य यंत्रणा मात्र सतर्क झाली असून हा तरुण प्रयागराज येथील कुंभमेळ्याहून जाऊन आला असल्याची माहिती मिळत आहे. या तरुणाला बऱ्हाणपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार घेतल्या नंतर डॉक्टरांनी पुढील उपचार न्युरोलिजिस्टकडे घेण्याचा सल्ला रुग्णच्या नातेवाईकांना दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार रावेर तालुक्यातील हा तरुण युवक कुंभमेळ्यासाठी प्रयागराज येथे गेला होता. मात्र कुंभमेळ्याहून परत आल्यावर त्याची बिघडली. तब्बेत ठीक नसल्याने तरुणाने बऱ्हाणपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेतले. उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी जिबीएस सदृश्य लक्षणे असल्याचे सांगितले. व पुढील उपचार न्युरोलॉजिस्ट किंवा मुंबई येथे घेण्याचा सल्ला दिला. सदरची माहिती प्रशासनाला समजताच आरोग्य यंत्रणा सतर्क होऊन जिल्हास्तरावरील प्रशासन व आरोग्य विभागाच्या हालचाली वेगाने सुरु झाल्या. आरोग्य विभागाचे एक पथक संबंधित गावाच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!