ब्रेकिंग : रक्षाबंधनाला दिडकोटी बहिणींना ३ हजाराचं गिफ्ट, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल मोठी बातमी
जळगाव, मंडे टू मंडे न्युज नेटवर्कl ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या अंमलबजावणीसाठी राज्यात युद्ध पातळीवर काम सुरु आहे. लाखो महिला अर्ज भरत आहेत. राज्य सरकारने या योजनेसाठी अर्ज भरण्याची ३१ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली आहे.राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातील दीड कोटी महिलांच्या बँक खात्यात रक्षाबंधनाच्या दिवशीच म्हणजेच १९ आगस्टला दोन महिन्यांचे दरमहा १५०० रुपये प्रमाणे योजनेचे तीन हजार रुपये पाठवण्याच्या तयारीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल ४ लाख २७ हजार २९१ महिलांनी अर्ज भरले, भरून घेण्यात आले. १ लाख ७३ हजार ५५६ महिलांनी ऑनलाईन तर २ लाख ५३ हजार ७३५ महिलांनी ऑफलाइन अर्ज भरले. जिल्ह्यातील एकूण ७ हजार ६७२ शासकीय मदत केंद्रांच्या माध्यमातून लाडकी बहीण योजने अंतर्गत महिलांचे अर्ज भरून घेण्यात आले. १ लाख ७३ हजार ५५६ महिलांनी ऑनलाईन तर २ लाख ५३ हजार ७३५ महिलांनी ऑफलाइन अर्ज भरले