ब्रेकिंग : केदारनाथ मध्ये हेलिकॉप्टर कोसळले, ५ भाविकांचा मृत्यू
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | उत्तराखंडमधील केदारनाथ धाम मध्ये आज सकाळी एक मोठा अपघात झाल्याची दुःखद घटनेची माहिती समोर येत आहे.
अहमदाबाद विमान अपघातानंतर केदारनाथ धाम मध्ये मोठा अपघात झाला. रुद्रप्रयाग जिल्ह्यातील गौरीकुंड आणि त्रिजुगीनारायण यांच्या दरम्यान आर्यन कंपनीचे हे हेलिकॉप्टर कोसळले असून खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याची सांगितले जात आहे.
आज सकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत असून आर्यन कंपनीच्या या हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह एकूण ७ लोक होते. गौरीकुंड आणि त्रिजुगीनारायण यांच्या दरम्यान आर्यन कंपनीचे हे हेलिकॉप्टर कोसळले. अपघातच मुख्य कारण खराब हवामानामुळे झाल्याचे सांगितले जात आहे.