ब्रेकिंग : विधानसभा उमेदवाराच्या मुलाचे अपहरण
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l एक मोठी धक्कादायक घटना समोर आली आहे. शिरूर हवेली मतदार संघाचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार अशोक पवार यांच्या मुलाचे अपहरण करण्यात आले असून त्याला मारहाणही करण्यात आली आहे.
शरद पवार राष्ट्रवादी गटाचे शिरूर हवेली विधानसभा मतदार संघाचे उमेदवार अशोक पवार यांचे समर्थकांनी पोलिस स्टेशनला मोठी गर्दी केली .शिरूर तालुक्यातील मांडणं गवण येथे ही घटना घडली आहे. अपहरण करून ही मारहाण कोणी केली? का केली ही सर्व करणे आता पोलिस शोधत आहेत.