महाराष्ट्रराष्ट्रीयसामाजिक

ब्रेकिंग : पुन्हा महाग झाला LPG गॅस सिलिंडर, बजेट कोलमडणार

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l ऐन दिवाळीत लक्ष्मीपूजना दिवशीच आज १ नोव्हेंबर २०२४ रोजी एलपीजी गॅस सिलिंडरचे दर वाढले असल्याने ग्राहकांच्या खिशाला मात्र कात्रीही लागणार आहे. १९ किलोच्या कमर्शियल गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे.

ताज्या दरा नुसार हे १९ किलोचे कमर्शियल गॅस सिलिंडर ६२ रुपयांनी महाग झाला आहे. मात्र, १४ किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही, ही बाब गृहिणींसाठी मात्र दिलासादायक आहे.

गेल्या काही महिन्यांपासून सतत्याने कमर्शियल गॅस सिलिंडरच्या किंमती वाढत आहेत. प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला LPG चे दर बदलत असतात. मात्र सुदैवानं मार्च नंतर घसगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!