ब्रेकिंग : महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाची मोठी कारवाई, चौघांना अटक
मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l महाराष्ट्र दहशतवाद विरोधीपथक जुहू युनिटने बनावट पासपोर्टच्या आधारे भारतात आलेल्या ४ बांगलादेशींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या चारही जणांना अटक केली आहे. एक मोठी धक्कादायक बाब म्हणजे यातील पहिल्या दोन जणांनी लोकसभेच्या निवडणुकीत मुंबईतील जोगेश्वरी येथे मतदान केल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय पारपत्र प्राप्त करणाऱ्या खालील नमुद मुळच्या बांगलादेशी इसमांना अटक करण्यात आली.
याना केली अटक
१). रियाज हुसेन शेख, वय ३३ वर्षे, धंदा इलेक्ट्रिशन, रा.ठी. डी-१/८, यमुनानगर, मिल्लतनगर, लोखंडवाला, अंधेरी (प), मुंबई. (मुळ गाव :- हृदयनगर, ठाणे- बशीरहाट, जिल्हा नोवाखाली, बांगलादेश)
२). सुलतान सिध्दीक शेख, वय ५४ वर्षे, धंदा रिक्षाचालक, रा.ठी. टी-१७३, अंबुजवाडी, आझाद नगर, गेट क्र. ८, मालवणी, मालाड, मुंबई ४०००९५ (मुळ गांव सिनोदी, पो. चंदेहाट, तहसिल बाटोया, जि. सदर नोवाखाली, बांगलादेश)
३). इब्राहिम शफिउल्ला शेख, वय ४६ वर्षे, धंदा भाजी विक्रेता, रा.ठी. रूम नं. २२८, दुसरा मजला, बिल्डींग नं. ५, म्हाडा कॉलनी, माहुल गांव, मुंबई-७४. (मुळ गांवः – साहेबर हाट, कादीरपुर, ठाणा- बेगमगंज, जि. नोवाखाली, बांगलादेश)
४). फारूख उस्मानगणी शेख, वय ३९ वर्षे, रा.ठी. २०६, आर/६ गुलशननगर, ओशिवरा, जोगेश्वरी (प), मुंबई. (मुळ गांवः- कबीर हाट, मोनीनगर, जि. नोवाखाली, बांगलादेश) अशी या आरोपींची नावे असून या चारही बांग्लादेशींवर दहशतवाद विरोधी पथकाने कलम ४६५, ४६८, ४७१, ३४ भा.दं.वि. सह कलम १२ (१A) भारतीय पारपत्र अधिनियम १९६७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
तसेच पोलिसांनी अटक केलेल्या बांगलादेशींनींकडून ते सुरत, गुजरात येथे राहण्यास आहे असे पुरावा प्राप्त केले आहेत. तपासात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली या आरोपींव्यतिरिक्त अन्य ५ जणांनीही बनावट कागदपत्र बनवल्याचे समोर आले असून पोलिस त्यांचा तपास करत आहेत. या आरोपीमधील एक आरोपी या बनावट कागदरपत्रांच्या आधारे सौदी अरेबिया येथे नोकरीसाठी गेल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे. दहशतवाद विरोधी पथक त्यांचेकडून आणखी काही माहिती मिळते का? या प्रयत्नात आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा