क्राईममहाराष्ट्र

ब्रेकिंग : कस्टम विभागाची मोठी कारवाई, कोट्यावधींच सोने जप्त

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l एक मोठी बातमी समोर आली असून कस्टम विभागाकडून एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. कस्टम विभागांन मुंबई विमानतळावर सव्वाचार कोटींच सोने जप्त केले आहे.

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागांन मोठी कारवाई केली आहे.
दोन प्रवाशांना या कारवाईमधून अटक करण्यात आली आहे.

नैरोबी वरून आलेल्या केनियन नागरिकांकडून १ कोटी ८५ लाख रुपयांच सोन जप्त करण्यात आले आहे. तसेच दुबईच्या प्रवाशांकडून ६१ लाखांच सोने जप्त करण्यात आले आहे. तसेच विमान तळावरील आगमन हॉल मधु १ कोटी ७४ लाख रुपयांच सोन जप्त केले आहे. अंतर्वस्त्र,पट्ट्याची बक्कल आणि ट्रॉलीत लपवून सोन्याची तस्करी केली जात होती.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!