Breaking News : माथेरान मध्ये तलावात ३ पर्यटक बुडाले
माथेरान, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | आजच पुण्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीजवळील पूल कोसळल्याची दुर्घटना घडली असताना आताच माथेरान मध्ये मोठी दुर्घटना घडल्याची घटना समोर आली आहे.
महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानच्या शॉर्लोट तलावात पोहण्यासाठी गेलेल्या ३ पर्यटक बुडाले आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
माथेरान मध्ये इको पाईंट, मंकी पाईंट, लायन्स पाईंट असे अनेक पाईंट आहेत. त्या पैकीच शॉर्लोट तलाव हा एक पाईंट आहे. या तलावात पोहण्यासाठी गेलेल्या
सुमित चव्हाण (१६), आर्यन खोब्रागडे (१९) आणि फिरोज शेख (१९) या तिघ पर्यटक बुडाल्याची माहिती मिळत आहे.
१० जण पाण्यात पोहण्यासाठी उतरले होते त्यापैकी तिघेजण बुडाल्याची माहिती मिळते आहे. सह्याद्री सेस्क्यू टीम आणि पोलिस यंत्रणा त्या ठिकाणी बचाव कार्य करीत आहे. अन्य बचाव पथके देखील घटनास्थळी पोहोचले आहे. पाण्याचा अंदज न आल्याने हे सर्वजण तलावात बुडाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे, तिघेही पर्यटक नवी मुंबई येथील असल्याची माहिती आहे.