भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

राष्ट्रीय

ब्रेकिंग न्यूज : उत्तराखंड मधील अलकनंदा नदीत प्रवाशांनी भरलेली बस कोसळून बुडाली, १० प्रवासी बेपत्ता

उत्तराखंड, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | आज सकाळी उत्तराखंड मधील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील घोलतीर येथे प्रवाशांनी भरलेली बस अलकनंदा नदीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. यात १० प्रवासी वाहून गेल्याचे सांगण्यात येत असून ते बेपत्ता आहेत. ९ प्रवाशाना बाहेर जे काढण्यात आलं असून एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून त्याचा मृतदेह हाती लागला आहे.मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला असल्याने अपघाताची तीव्रता अधिकच वाढली आहे. या गाडीतून २० प्रवासी प्रवास करीत असल्याची माहिती मिळत आहे. बद्रिनाथ राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या या अपघाताबाबत माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली असून, मदत आणि बचाव कार्य सुरू केलं आहे.

आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सचिव विनोद कुमार सुमन यांनी
या अपघाताबाबत माहिती देताना सांगितले की, अपघातग्रस्त वाहन हे टेम्पो ट्रॅव्हलर असण्याची शक्यता आहे. ही गाडी प्रवाशांना घेऊन जात होती. तसेच या गाडीमधून १८ ते २० प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती आहे. आपत्ती व्यवस्थापनाचं पथक घटनास्थळी पोहोचलं असून, आता पर्यंत ८ ते ९ प्रवाशांना वाचवण्यात आलं आहे. तर एका व्यक्तीचा मृतदेह हाती लागला आहे.
अपघातात जखमी झालेल्यांमध्ये ९ वर्षांच्या दोन मुलांचा समावेश असून, अपघातग्रस्त वाहनामधील १० जण अद्याप बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!