Uncategorized

नाशिकमधील लष्करी तळाच्या पाकिस्तानातून हेरगिरीचे कानेक्श समोर

नाशिक (प्रतिनिधी)। भारत आणि चीन दरम्यानचे संबंध तणावपूर्ण असतानाच पाकिस्तानने नेहमीप्रमाणे भारतात हेरगिरी सुरू ठेवली आहे. या हेरगिरीचे नाशिक कनेक्शनही शनिवारी (दि. ३) पुढे आले. देवळाली कॅम्प परिसरातील आर्टिलरी सेंटरच्या सैनिकी हॉस्पिटलमध्ये एका रोजंदारीवरील कर्मचार्‍याने व्हॉट्स अ‍ॅपद्वारे हॉस्पिटलचे फोटो थेट पाकिस्तानला पाठवल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. या युवकाला हेरगिरीच्या आरोपाखाली देवळाली कॅम्प पोलिसांनी अटक केली आहे.

संजीव कुमार हा २१ वर्षीय मुलगा महिनाभरापासून लष्करी भागात एका ठेकेदाराकडे रोजंदारीवर काम करत होता. शनिवारी सकाळी गेटवरील लष्करी जवानांनी या मुलाची तपासणी केली असता त्याच्या मोबाईलमध्ये लष्करी विभागातील फोटो पाकिस्तानातील मोबाईल व्हॉट्स अ‍ॅपवर पाठवण्यात आल्याचे आढळुन आलेे. या प्रकाराची गंभीर दखल घेत सुभेदार ओंकार नाथ यांनी तत्काळ त्याला ताब्यात घेऊन देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. लष्करी अधिकारी व वरिष्ठ पोलीस अधिकारी या व्यक्तीची सखोल चौकशी करत असुन, लष्करी विभागाचा फोटो पाकिस्तानी मोबाईल क्रमांकावर पाठवणे हा हेरगिरीचा प्रकार असल्याची शक्यता आहे. या मुलाला अटक करण्यात आली असून, पोलिस उपायुक्त विजय खरात, सहायक पोलिस आयुक्त अशोक नखाते, सह सहायक पोलिस निरीक्षक आर. टी. मोरे, देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाषचंद्र देशमुख अधिक चौकशी करत आहेत.

लष्करी हद्दीत मोबाईल वापरण्यास बंदी आहे. तरीही मोबाईलचा वापर होत असल्याचे या घटनेतून पुढे आले आहे. आर्टीलरी सेंटरमध्ये तोफ प्रशिक्षण केंद्र आहे. त्यामुळे लष्करी हद्दीतून पाकिस्तानात हेरगिरीचा प्रकार उघड झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पाकिस्तानकडून हेरगिरीसाठी कुमारला नियुक्त केले गेले की काय, अशी शंकाही उपस्थित केली जात आहे. त्या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!