ब्रेकिंग : नायलॉन मांजा ने घेतला २३ वर्षीय तरुणाचा बळी
नाशिक, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l नायलॉन मांजा संदर्भात एक मोठी खळबळ जनक घटना समोर आली आहे. मकर संक्राती निमित्ताने ठिकठिकाणी पतंग उडवणाऱ्यांची संख्या वाढत आहे. पतंग उडविण्यासाठी लहान मुलांसह मोठ्यांपर्यंत सर्वांकडून नायलॉनच्या मांजा चा सर्रास वापर केला जात असल्याचं समोर आलं आहे. या माजां मुळे आता पर्यंत अनेक जण जबर जखमी झाले आहेत. आता तर या नायलॉन मांजा दोऱ्याने नाशिक मधून एकाच जीव घेतल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे.
नाशिक मध्ये सोनू किसन धोत्रे. या २३ वर्षीय तरुणाचा नायलॉन मांजाने गळा चिरला जावून मृत्यू झाला आहे. हा तरुण पाथर्डी फाटा परिसरातील असल्याची माहिती मिळत आहे. या तरुणाला आधी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्य़ात आलं होतं. त्यानंतर त्याला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्य़ात आलं. यातच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली.
येत्या १३ मे रोजी सोनूचं लग्न होतं. ड्रायव्हर व्यवसायाकरिता तो गुजरातमधील वलसाड येथे स्थायिक झाला होता. आज संक्रांतीला सणासुधीसाठी तो नाशिकला आपल्या घरी देवळाली कॅम्प येथे आला होता. त्यांच्या वडिलांचं काही वर्षांपूर्वीच निधन झालं होतं. त्यामुळे तोच घराचा सांभाळ करीत होता.
नायलॉन मांजा मुळे दिवसेंदिवस अशा अपघातांना आमंत्रण मिळत आहे. मकरसंक्रांत निमित्त पतंग उडविण्यासाठी मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजा दिसून येत आहे. पोलीस अनेक ठिकाणी छापेमारी करीत आहेत. मात्र अनेक ठिकाणी सर्रासपणे नायलॉन मांजा विक्री होत आहे. याचा परिणाम पशुपक्ष्यांना देखील पडताना दिसून येतोय यामुळे नायलॉन मांजा विक्रीवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे. नायलॉन मांजाच्या विक्रीवर व वापरण्यावर आडा बसवण्याची गरज आहे.