भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्रराजकीय

ब्रेकिंग : आज फक्त तिघांचाचं शपथविधी? मंत्रिमंडळाचा तिढा कायम?

मुंबई, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याला अवघे काही तास उरले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन उपमुख्यमंत्री, असा तीन जणांचाच आज शपथविधी पार पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सह देशातील दिग्गज नेते हजेरी लावणार आहेत.

आज महायुतीच्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा आझाद मैदानावर पार पडणार आहे. आणि आताच
मिळालेल्या माहितीनुसार, महायुतीतील तीन घटक पक्षांमध्ये खातेवाटप आणि मंत्र्यांची संख्या यावर एकमत झाल्यानंतरच इतरांचे शपथविधी होणार आहे. अशीही माहिती मिळत आहे की, १६ डिसेंबरपासून होणाऱ्या हिवाळी अधिवेशन आधी इतर मंत्र्यांचा शपथविधी कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल,

दरम्यान, तिघांचा शपथविधी न करता प्रत्येकी दोन किंवा तीन म्हणजे एकूण नऊ किंवा बारा मंत्र्यांचा शपथविधी करण्याच्या मुद्द्यावर वरिष्ठ नेत्यांची रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरु होती. पण याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली आहे. याबाबतचा अंतिम निर्णय समोर येईल मात्र तूर्तास तीन जणांचाच शपथविधी होणार असल्याचे समजतेय. मात्र मिळालेल्या माहितीनुसार, मंत्र्यांची संख्या व खातेवाटप निर्णय जो पर्यंत होत नाही तो पर्यंत मंत्र्यांचा शपथविधी होणार नाही. असे सांगण्यात आले. शपथविधी सोहळा आज संध्याकाळी साडे पाच वाजता होणार असून मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री आणि इतर कोण कोण मंत्रिपदाची शपथ घेणार का? या कडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!