ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यातील ग्रामविस्तार अधिकाऱ्यांसह सहाय्यक अधिकारी १ लाखाची लाच घेताना एसीबी च्या जाळ्यात
जळगाव, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l जळगाव जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली असून पारोळा पंचायत समितीच्या ग्रामविस्तार अधिकाऱ्या सह सहाय्यक कार्यक्रम अधिकाऱ्याला जळगाव च्या लाचलुचपत विभागाच्या पथकाने १ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.
अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे राहणार – धुळ पिंप्री ता.पारोळा जि.जळगांव येथील २५ वर्षीय पुरुष असून सरपंच यांचा मुलगा आहे. त्यांचे गावातील ग्रामपंचायत येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत काँक्रेट व पेव्हर ब्लॉक चे एकूण चार कामाचे प्रत्येकी १५ लाख रुपये प्रमाणे एकूण ६०,०००००/- लाखाचे काम शासनाकडून मंजूर होवून आले होते. सदर कामाची वर्क ऑर्डर काढण्यासाठी पारोळा पंचायत समितीचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी कल्पेश ज्ञानेश्वर बेलदार वय ,वय २८ वर्ष याने बीडीओ यांचे दोन टक्के प्रमाणे व स्वतःसाठी एक टक्के प्रमाणे अशी १ लाख ८० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. शेवटी तडजोडी अंती १ लाख रुपये ठरले.
त्याबाबत तक्रारदार यांनी लाप्रविभाग जळगाव येथे दि.१०/९/२०२४ रोजी तक्रार दिली होती. लाच मागणीची पडताळणी केली असता सुनिल अमृत पाटील वय ५८ वर्ष, ग्रामविस्तार अधिकारी प.स. पारोळा ( ग्रां. विभाग वर्ग ३) यांनी प्रोत्साहन देऊन व कल्पेश ज्ञानेश्वर बेलदार वय २८ वर्ष. सहाय्यक कार्यक्रम अधिकारी (कंत्राटी सेवक ) नेमणूक प.स. पारोळा. यांनी पंचासमक्ष तडजोडअंती १,००,०००/- रुपये (एक लाख) बीडीओ साठी लाचेची मागणी करून सदरची लाच रक्कम कल्पेश बेलदार हे स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्यांचे वर पारोळा पोलीस स्टेशन, जि.जळगांव येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे .
सदरची कारवाई जळगाव युनिट चे सापळा व तपास अधिकारी योगेश ठाकूर पोलीस उप अधीक्षक लाप्रवि जळगांव. पोहेकॉ/सुनिल वानखेडे,पोना . किशोर महाजन,पोना.बाळू मराठे, नैत्रा जाधव,पोलीस निरीक्षक, स्मिता नवघरे, पोलीस निरीक्षक. पोहेकॉ,सुरेश पाटील,पो.ह.रविंद्र घुगे, म. पो.हे.कॉ. शैला धनगर,प्रदीप पोळ,प्रणेश ठाकुर,सचिन चाटे या पथकाने केली.