ब्रेकिंग : एक लाखाची लाच भोवली, सरपंचा सह माजी सरपंच एसीबी च्या जाळ्यात
मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l ना हरकत प्रमाणपत्र देण्या साठी अडीच लाखांची लाच मागून पहिल्या टप्प्याचे एक लाख रुपये स्वीकारताना धुळे तालुक्यातील नंदाने ग्रामपंचायतीचे सरपंच रविंद्र निंबा पाटील वय ४२ वर्ष व माजी सरपंच अतुल विठ्ठल शिरसाड वय ५० वर्ष याना धुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.
२९ वर्षीय तक्रारदार यांच्या मालकीची मौजे नंदाने ता. जि. धुळे येथे गट नंबर ५९/३ येथे शेतजमीन असून सदर जमिनीवर नायरा कंपनीचा पेट्रोल पंप उभारण्याची परवानगी मिळणे करिता विभागीय व्यवस्थापन नायरा एजन्सी लिमिटेड यांनी दि. ०१. ०९. २०२४ रोजी धुळे जिल्हा अधिकारी कार्यालयात प्रस्ताव सादर केला होता. त्यावरून जिल्हाधिकारी कार्यालयाने सरपंच/ग्रामसेवक ग्रामपंचायत नंदाने ता. जि. धुळे यांच्या नावे सदरचा पेट्रोल पंप उभारणी करिता ना हरकत प्रमाणपत्र मिळणे करिता दिलेले पत्र तक्रारदार यांनी ग्रामसेवक शशिकांत पाटील यांचे कडे जमा केले होते.
त्यानंतर तक्रारदार यांनी त्यांचे मित्र योगेश पाटील यांचे सह वेळोवेळी ग्रामपंचायत कार्यालय नंदाने येथे जाऊन सरपंच रवींद्र निंबा पाटील, – वय ४२ वर्ष, व ग्रामसेवक शशिकांत पाटील यांची भेट घेऊन पाठपुरावा केला असता सरपंच रवींद्र निंबा पाटील. यांनी ग्रामपंचायतीमध्ये ठराव करून ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी स्वतः करिता व ग्रामसेवक शशिकांत पाटील यांचे करिता ५ लाख रुपये लाचेची मागणी केल्याची आज दि. २४.०१ २०२५ रोजी ला.प्र.वि. धुळे कार्यालयाकडे तक्रार दिली होती. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीची आज रोजी पडताळणी केली असता, पडताळणी दरम्यान सरपंच रवींद्र निंबा पाटील. यांनी ५ लाख रुपये लाचेची मागणी करून त्यांचे सोबत हजर असलेले माजी सरपंच
अतुल विठ्ठल शिरसाठ,
यांनी तक्रारदार यांच्याकडे तडजोडी अंती २ लाख ५० हजार रुपये लाचेची मागणी करून त्यापैकी १ लाख रुपयाचा पहिला हप्ता स्वीकारल्याचे मान्य केले होते त्यानंतर सापळा कारवाई दरम्यान सरपंच रवींद्र निंबा पाटील. यांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी करून १ लाख रुपये लाचेची रक्कम स्वीकारून माजी सरपंच अतुल विठ्ठल शिरसाठ, यांचेकडे दिली असता, त्यांनी ती स्वीकारून त्यांचे खिशात ठेवून घेतली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले. त्या नुसार रवींद्र निंबा पाटील, – वय ४२ वर्ष, सरपंच, ग्रामपंचायत नंदाने, ता. जि. – धुळे. आणि अतुल विठ्ठल शिरसाठ, वय- ५० वर्षे, माजी सरपंच, ग्रामपंचायत नंदाने ता. जि. धुळे.बत्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई परिवेक्षण अधिकारी सचिन साळुंखे,
पोलीस उपअधीक्षक लाचलुतपत प्रतिबंधक विभाग धुळे. सापळा अधिकारी रूपाली खांडवी, पोलीस निरीक्षक.
ला.प्र. विभाग, धुळे. पो. हवा. राजन कदम, पो.कॉ. प्रशांत बागुल, सर्व नेमणूक ला.प्र.वि. धुळे युनिट यांनी केली.