ब्रेकिंग : भुसावळ मध्ये गोळीबार, युवक गंभीर, हल्लेखोर फरार, सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l भुसावळ शहर गुन्हेगारीमुळे सतत चर्चेत आहे. कधी खून तर कधी गोळीबार अशा अनेक गुन्हेगारी घटनां भुसावळ मध्ये घडत असतात. त्यातच आज सकाळी पुन्हा गोळीबाराची घटना घडली यात एक युवक गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल केले असता त्याच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, हल्लेखोर मात्र फरार आहे. नेहमीच्या अशा घटनांमुळे भुसावळ शहराचा सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.बातमी लिहीत असताना तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
प्राप्त माहितीनुसार, भुसावळ शहरातील जाम मोहल्ला भागातील हॉटेल डीडी सेंटर येथे सकाळी साडेसहा वाजता तरुणावर गोळीबार करण्यात आला. गोळीबाराची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला, मात्र हल्लेखोर फरार असून त्यांचा पोलिस कडून शोध घेत आहेत.सदर गोळीबाराचा हल्ला हा पूर्व वैमनस्यातून झाला असल्याचे सांगण्यात येत असले तरी घडलेल्या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भुसावळमध्ये सतत वाढत्या गुन्हेगारीचा प्रश्न चिंताजनक असून पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर बनत चालला यावर ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.
मिळालेल्या माहितीनुसार तहरीन नजीर शेख (वय ३०) असे मृताचे नाव आहे. भुसावळ शहरात यापूर्वी आफात पटेल नावाच्या तरुणाचा खून झाला होता. या प्रकरणातील तो प्रमुख संशयित आरोपी असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली. दरम्यान शुक्रवारी दि. १० जानेवारी रोजी तहरीन सकाळी चहा पिण्यासाठी डीडी सुपर कोल्ड्रिक्स आणि चहा येथे चहा घेण्यासाठी आला होता. यावेळी संशयित चार ते पाच संशयित आरोपींनी त्याच्यावर बंदुकीतून पाच फैरी झाडल्या.