भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

ब्रेकिंग : दुकानांची तोडफोड, १५ दुकाने जाळली, गाड्यांची जाळपोळ, दोन गटात संघर्ष, गावात मोठा तणाव

जळगाव जिल्ह्यातील घटना

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l ३१ डिसेंबर च्या रात्री दोन गटात संघर्ष उफाळून आला, या संघर्षाने भीषण रूप धारण करत त्यातून गाड्यांची जाळपोळ, दुकानांची तोडफोड करत जवळ जवळ १५ दुकानाना आग लावून जाळल्याची माहिती मिळत आहे. ही घटना जळगाव जिल्ह्यातील पाळधी या गावात घडली.

जळगाव तालुक्यातील राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी गावात दोन वाहनांमध्ये कट लागल्याने गावातील दोन गटात बाचाबाची झाली. आणि वादाला ठिणगी पडली. थोड्याच वेळात या वादाचे पर्यवसान दंगलीत झाले. या दंगलीनंतर काही जणांनी टिव्ही, मोबाईलच्या दुकानांची जाळपोळ केली. तीन चारचाकी गाड्या पेटवून दिल्याची माहिती समोर आली आहे. या वादामुळे पाळधीत दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत ४ संशयिताला ताब्यात घेतले आहे.

पाळधी गावातील मुख्य रस्त्यावर रात्री नऊ वाजेच्या सुमारास एका राजकीय नेत्याच्या गाडीचा दुसऱ्या गाडीला कट लागल्याने वाद झाला. वाहनचालकांच्या वादानंतर हे प्रकरण तेथेच मिटले होते. परंतु थोड्याच वेळात दोन्ही गटातील लोक ग्रामपंचायत चौकात समोरासमोर आल्याने पुन्हा वाद उफाळला. यानंतर झालेल्या हाणामारीत दंगल पसरली. एका गटाने परिसरातील पाच दुकानांची जाळपोळ केली. यामुळे जिल्हा पोलिस अधीक्षकांसह पोलिसांचे पथक पाळधीत दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत पथकाने या परिसरामध्ये गस्त कायम ठेवली होती. या घटनेमुळे परिसरामध्ये गोंधळ निर्माण झाला. महामार्गावरील सर्व हॉटेल्स पोलिसांनी तात्काळ बंद केल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, 31 डिसेंबरच्या रात्री पाळधी गावातून मंत्री गुलाबराव पाटील यांच्या कुटुंबीयाला घेऊन एक गाडी चालली होती. यावेळी या गाडीच्या वाहनचालकाने हॉर्न वाजवला. याचा राग आल्याने गावातील काही तरुणांनी चालकास शिवीगाळ केल्याची माहिती समोर आली आहे. वाहनात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पत्नी असल्याने शिवीगाळ करणाऱ्या तरुणांवर काही शिवसैनिक धावून गेले. यानंतर दोन गट आमने सामने आली आणि त्यातूनच ही दगडफेक व जाळपोळीची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पाळधी गावात धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले असून सद्यस्थितीत पाळधी गावात तणावपूर्ण शांतता आहे. तसेच दगडफेक व जाळपोळ करणारे संशयित हे पसार झाले असून रात्री उशिरापर्यंत संशयीतांचा पोलिसांकडून शोध सुरू होता. पाळधी गावात झालेल्या दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेविरोधात अज्ञात २५ ते ३० लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यातील ८ ते १० संशयितांना ताब्यात घेतलं आहे. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी पाळधी गावात ठांड मांडून बसले आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!