ब्रेकिंग : बंद राहणार राज्यातील शाळा २५ सप्टेंबर रोजी, शाळांचा दर्जा घसरून त्या बंद पडण्याची भीती
मुंबई, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत.शिक्षक संचमान्यतेचा १५ मार्च २०२४ चा आणि कंत्राटी शिक्षक भरतीचा ५ सप्टेंबर २०२४ चा शासन निर्णय वाडीवस्तीवरील विद्यार्थ्यांवर अन्यायकारक असल्याने, तसेच त्यासोबत सेवानिवृत्त शिक्षकाची कंत्राटी पदधतीने नेमणूक केली जाणार आहे.
या निर्णयाबमुळे शाळांचा दर्जा घसरून त्या बंद पडण्याची भीती शिक्षक संघटनांनी व्यक्त केलीय.म्हणून हे दोन्ही शासन निर्णय रद्द करावेत या मागणीसाठी राज्यातील सर्व प्राथमिक शाळा २५ सप्टेंबर रोजी बंद ठेवून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्या मुळे राज्यातील सर्व शाळा २५ सप्टेंबर रोजी बंद राहणार आहेत. या दिवशी सर्व प्राथमिक शाळांचे शिक्षक सामुहिक रजा आंदोलन करीत प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचे पुणे येथे नुकत्याच झालेल्या राज्यातील सर्व शिक्षक संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला.
या बाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांनी म्हंटले आहे की, शासनाने घेतलेल्या नवीन धोरणानुसार २० किंवा त्यापेक्षा कमी पट असलेल्या शाळांवर केवळ एकच कायम शिक्षक दिला जाणार असून त्यासोबत सेवानिवृत्त शिक्षकाची कंत्राटी पदधतीने नेमणूक केली जाणार आहे. यामुळे शाळांचा दर्जा घसरून त्या बंद पडण्याची भीती शिक्षक संघटनांनी व्यक्त केलीय.
सुधारीत शिक्षक संच मान्यता आणि कंत्राटी शिक्षक भरतीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली असून याला राज्यातील सर्व शिक्षक संघटनांनी कडाडून विरोध केलाय. ही अंमलबजावणी सुरू झाल्यास राज्याच्या ग्रामीण भागातील १ लाख ८५ हजार विद्यार्थी आणि २९ हजाराहून अधिक शिक्षकांचे भवितव्य अंधारात जाण्याची भीती व्यक्त होत आहे. शासनाने हे दोन्ही निर्णय रद्द करावेत यासाठी राज्यभरातील सर्व शिक्षक संघटना एकवटल्या आहेत.