ब्रेकिंग : गोरक्षकांवर दगडफेक व मारहाण, आरोपीना अटके साठी बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर दोन तास रस्ता रोको,संत महात्म्यांनी दिले निवेदन
सावदा, ता .रावेर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l रावेर तालुक्यातील मोठे वाघोदा येथे अवैधरित्या गोवंशाची वाहतूक होत असल्याची आज दिनांक २८ फेब्रुवारी रोजी
गोरक्षकांना माहिती मिळाल्याने गोवंशाची सुटका करण्याकरता गोरक्षकांनी या गाडी ला थांबवण्याचा प्रयत्न केला असता गोरक्षकांवर तुफान दगडफेक करून त्यांना मारहाण करण्यात आली. यामुळे संतप्त झालेल्या गोरक्षकांचं वाघोदा सावदा चिनावल येथील अनेक नागरिकांनी या ठिकाणी धाव घेऊन गोरक्षकांवर हल्ला करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा त्यांना अटक करा यासाठी सुमारे दोन तास बऱ्हाणपूर- अंकलेश्वर महामार्गावरील वाघोदा येथे रास्ता रोको केला. यावेळी झालेल्या बाचाबाचीत वाघोदा येथील पोलीस पाटील यांनासुद्धा मारहाण करण्यात आली. रस्ता रोको मुळे बऱ्हाणपूर – अंकलेश्वर महामार्गावर वाघोदया जवळ वाहतूक ठप्प होऊन दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
मोठे वाघोदा, निंभोरा, चिनावल सावदा परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून सर्रास पणे अवैध गोवंश वाहतूक केली जाते. याला पाय बंद घालण्यासाठी परिसरातील गोरक्षक प्रयत्न करीत आहे. त्यातच आज अवधरीत्या गो वंश वाहतुकीची गोरक्षकांना माहिती मिळाल्याने त्यांनी सदर गाडीला थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र वाघोदा येथे गोरक्षकांवरच हल्ला करण्यात आल्याने वाघोदा येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते तसेच महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज, खंडेराव देवस्थानचे महामंडलेश्वर पवन दासजी महाराज, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा महामंत्री योगेश भंगाळे यांचे सह अनेक कार्यकर्त्यांनी धाव घेऊन गोरक्षकांवर हल्ला करणाऱ्या ना तात्काळ अटक करा परिसरातील अवैध गोवंश वाहतूक बंद करा याबाबतची मागणी पोलीस प्रशासनाकडे दिली असून सदर प्रकार एक महिन्याच्या आत बंद न झाल्यास पुन्हा रोस्तो रोको करण्यात येईल असे महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज यांनी गो रक्षकांना आश्वासन दिले. महाराजांनी गो रक्षकांना आश्वासन दिल्यांतर रस्ता मोकळा करण्यात आला.
निवेदन देते वेळी रावेरचे आमदार अमोल जावळे यांनी समस्या जाणून घेऊन पुढची कारवाई करण्याचे आदेश दिले. मोठा वाघोदा येथे पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून दहा ते बारा लोकांच्या विरोधात तक्रार असल्याची माहिती मिळत आहे. पोलिस पुढील कारवाई करत आहेत.