भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमयावल

ब्रेकिंग : ३० हजारांची लाच घेताना राज्य उत्पादन शुल्क विभागाचा उप निरीक्षक जाळ्यात, फैजपूर मध्ये गुन्हा दाखल

फैजपूर, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l दिनांक १९ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक निकालाच्या पूर्व संध्येला एक खळबळजनक बातमी समोर आलेली असून, भुसावळ राज्य उत्पादन शुल्क विभागातील उपनिरीक्षक किरण सोनवणे वय ३९ यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने खाजगी पंटर किरण माधव सुर्यवंशी, वय ३७. या दोघांना रुपये ३० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.

१९ नोव्हेंबर रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उप निरीक्षक किरण सोनवणे त्याचे सोबत असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथकाने तक्रारदार यांचे घरी जाऊन अवैध दारू विक्री बाबत छापा टाकला होता.
सदरचा छापा मध्ये तक्रारदार यांचेकडेस असलेला ३० ते ३५ हजार रुपये किंमतीच्या दारुच्या बाटल्या जप्त केल्या होत्या व दारूची केस न करण्यासाठी १० हजार रुपये घेतले होते. दारूची केस न करण्यासाठी तक्रारदार ३५ वर्षीय पुरुष यांच्या कडून ५० हजार रुपयांची मागणी केली होती.

.त्याबाबत तक्रारदार यांनी २२ नोंव्हेवर रोजी  समक्ष लाप्रवि जळगांव यांना तक्रार दिली होती.सदर तक्रारीची पंचा समक्ष लाच मागणी पडताळणी केली असता पडताळणी कारवाई दरम्यान दोन्ही आरोपीनी दारू विक्री करण्यासाठी व तक्रारदार यांना त्रास न देण्यासाठी प्रथम पन्नास हजार रुपयां ची मागणी करून तडजोड अंती तीस हजार रुपयाची मागणी करून लाचेची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली होती . २२ नोव्हेंबर रोजी यातील दुसरा आरोप किरण माधव सुर्यवंशी, वय ३७ ,धंदा – मजुरी, हुडको कॉलनी भुसावळ ( खाजगी इसम) यास तीस हजार रुपये लाचेची रक्कम स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले असून किरण सोनवणे, वय ३९ वर्षे, व्यवसाय नोकरी , उप निरीक्षक, नेम. राज्य उत्पादन शुल्क विभाग, भुसावळ ( वर्ग २ ), व किरण माधव सुर्यवंशी, वय ३७,धंदा – मजुरी, रा. हुडको कॉलनी भुसावळ ( खाजगी इसम) यांचेवर फैजपूर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरील कार्यवाही ही योगेश ठाकूर पोलीस उपअधीक्षक लाप्रवि जळगांव यांच्या अचूक नियोजन व पाठपुराव्यामुळे सापळा रचून तपास अधिकारी श्रीमती स्मिता नवघरे, पोलीस निरीक्षक, लाप्रवि जळगांव, बाळू मराठे,राकेश दुसाने यांच्या पथकाने केली.

अधिक चौकशी करता सदरील घटना ही रावेर तालुक्यातील कोचुर येथील असल्याची माहिती मिळत असून दिनांक १९ रोजी कोचुर या गावात, गावठी दारू – ३५ लिटर, देशी दारू -५४ लिटर, बिअर -१५.६ असा एकूण ३१,५६० किमतीचा
मुद्देमाल पकडला होता. ही माहिती संबंधित अधिकाऱ्यानेच दिली होती. मात्र तडजोडी अंती हा प्रकार घडला.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!