भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगावपारोळा

ब्रेकिंग : एन.ए. झालेल्या प्लॉटवर नोंदी लावण्यासाठी ६ हजारांची लाच घेताना तलाठी एसीबी च्या जाळ्यात

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l N. A. झालेल्या शेतातील ९ प्लॉटवर नोंदी लावून देण्याच्या मोबदल्यात शेवगे बुद्रुक तालुका पारोळा येथील तलाठी महेशकुमार भाईदास सोनावणे (वय ५०) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज गुरुवारी ६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना जळगाव लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याने खळबळ उडाली आहे. पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

महेशकुमार भाईदास सोनावणे यांनी शेतातील ९ प्लॉटवर एन.ए.च्या नोंदी लावून देण्याच्या मोबदल्यात एका ४२ वर्षीय तक्रारदाराकडून प्रत्येक नोंदीसाठी १,१३० रुपये प्रमाणे एकूण १०,१७० रुपयांची लाच मागितली होती. तडजोडी अंती ६,००० रुपये स्वीकारताना तलाठी महेशकुमार भाईदास सोनावणे वय ५० वर्षे, व्यवसाय- नोकरी, तलाठी, सजा शेवगे बुद्रुक ता. पारोळा, जि. जळगाव. यांना सापळा कारवाईत आज अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई पर्यवेक्षण अधिकारी योगेश ठाकूर, पोलीस उप अधीक्षक लाप्रवि जळगांव. सापळा अधिकारी श्रीमती स्मिता नवघरे, पोलीस निरीक्षक ला. प्र. वि. जळगांव. पो.हे.कॉ./किशोर महाजन. पोकॉ/ राकेश दुसाणे, पोकॉ/ पोळ यांनी केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!