भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावबोदवळ

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथील तहसीलदार नितीन कुमार देवरे निलंबित, बांगलादेशींना जन्म दाखले दिल्याचा ठपका

जळगाव/ बोदवड. मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथील तहसीलदार नितीशकुमार देवरे याना बांगलादेशीना जन्म दाखले दिल्याप्रकरणी शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. मालेगावमधील जन्म दाखले प्रमाणपत्र प्रकरण देवरे या तहसिलदारांना भोवल्याचे समोर आले आहे. मालेगावमध्ये बांगलादेशींना जन्म दाखले दिल्याचा ठपका ठेवत मालेगावचे तत्कालीन तहसीलदार ( सध्या कार्यरत नेमणूक बोदवड,तहसीलदार  जिल्हा जळगाव) सध्या नितीनकुमार देवरे, यांना निलंबित करण्यात आले आहे. तहसीलदार देवरे, यांची विभागीय चौकशी होणार आहे. जन्म दाखले देतांना कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आालाय. माजी खासदार आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. महसूल विभागाचे सह सचिव अजित देशमुख यांनी निलंबनाचे आदेश काढले आहेत. बांगलादेशी रोहिंग्यांना मालेगावात जन्म दाखले देण्यात आल्याची तक्रार किरीट सोमय्या यांनी केली होती.

आदेशात म्हटले आहे की, ज्याअर्थी श्री. नितीनकुमार देवरे तहसिलदार, मालेगांव, जि. नाशिक.( सध्या कार्यरत नेमणूक बोदवड,तहसीलदार  जिल्हा जळगाव)  यांनी उक्त पदावर कार्यरत असताना कार्यालयीन कामकाज शासन निर्देशाप्रमाणे न करता आणि शासकीय कामकाजात पुरेशे गांर्भीय न दर्शविता जन्म प्रमाणपत्रे / दाखले निर्गमित केल्यामुळे त्यांनी कर्तव्यात कसूरी करुन महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मधील नियम ३ चे उल्लंघन केले असल्याने श्री. नितीनकुमार देवरे, तत्कालीन तहसिलदार, मालेगांव, जि. नाशिक यांच्याविरुध्द महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १९७९ मधील तरतुदीअन्वये विभागीय चौकशीची कारवाई करण्याच्या अधिनतेने श्री. नितीनकुमार देवरे यांना निलंबित करणे आवश्यक आहे.

त्याअर्थी, महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १९७९ च्या नियम ४ (१) (अ) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन आता उक्त श्री. नितीन कुमार देवरे, तत्कालीन तहसिलदार, मालेगांव, जि. नाशिक ( सध्या नेमणूक बोदवड,तहसीलदार,  जिल्हा जळगाव). यांना तात्काळ प्रभावाने पुढील आदेश होईपर्यंत शासन सेवेतून निलंबित करण्यात येत आहे.

शासन आदेशात असेही आदेश देत आहेत की, प्रस्तुत आदेश अंमलात असेपर्यंत श्री. नितीन कुमार देवरे, तत्कालीन तहसिलदार, मालेगांव, जि. नाशिक  ( सध्या कार्यरत नेमणूक बोदवड,तहसीलदार  जिल्हा जळगाव)  यांचे निलंबन कालावधीतील मुख्यालय जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे असेल व त्यांनी जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या पूर्व संमत्तीशिवाय मुख्यालय सोडता कामा नये.

श्री. नितीन कुमार देवरे, तत्कालीन तहसिलदार, मालेगांव, जि. नाशिक यांना त्यांच्या निलंबनाच्या कालावधीत निलंबन निर्वाह भत्ता देण्यासंबंधी खालील आदेश देण्यात येत आहेतः-

निलंबनाच्या कालावधीत श्री. नितीन कुमार देवरे, तत्का. तहसिलदार, मालेगांव, जि. नाशिक यांनी खाजगी नोकरी स्वीकारू नये किंवा धंदा वा व्यापार करू नये. (त्यांनी तसे केल्यास ते दोषारोपास पात्र ठरतील व त्या अनुषंगाने त्यांच्याविरुध्द कारवाई करण्यात येईल) व तसे केल्यास ते निलंबन निर्वाह भत्ता गमाविण्यास पात्र ठरतील.

निलंबनाच्या कालावधीत त्यांना निलंबन भत्ता जेव्हा देण्यात येईल त्या प्रत्येक वेळी त्यांनी खाजगी नोकरी स्वीकारलेली नाही किंवा कोणताही खाजगी धंदा वा व्यापार करीत नाही अशा त-हेचे प्रमाणपत्र श्री. नितीन कुमार देवरे,तत्कालीन तहसिलदार, मालेगांव, जि. नाशिक यांना द्यावे लागेल.

महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी, स्वोयेत्तर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळातील प्रदाने) नियम, १९८१ च्या नियम ६८ मधील तरतुदीनुसार श्री. नितीन कुमार देवरे,तत्कालीन तहसिलदार, मालेगांव, जि. नाशिक. ( सध्या कार्यरत नेमणूक बोदवड,तहसीलदार  जिल्हा जळगाव) यांना निलंबन निर्वाह भत्ता व इतर पूरक भत्ते देण्यात येतील.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!