ब्रेकिंग : आला रे फोन.. संजय सावकारे मंत्री पदाची शपथ घेणार
भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l जळगाव जिल्ह्यातील भुसावळ चे भाजपचे आमदार संजय सावकारे यांना मंत्री पदासाठी फोन आला आहे. त्यांना भाजप प्रदेशाध्यक्ष यांनी फोन केला आहे. फोन येताच संजय सावकारे व त्यांचे कुटुंबीय नागपूर कडे रवाना झाले आहेत.
भुसावळ चे आमदार संजय सावकारे याना मंत्री पदासाठी फोन आल्याचे माहिती होताच भुसावळ मध्ये भाजप कार्यकर्त्यांनी फटाके वाजवत ,एकमेकांना पेढा भरवत मोठा जल्लोष केला.
भुसावळ मतदार संघात चौथ्यांदा निवडून येण्याचा मान संजय सावकारे याना मिळाला असून संजय सावकारे हे दुसऱ्यांदा मंत्री पदाची शपथ घेत आहेत. मी सर्व भुसावळ वासिय व मतदारांचे आभार मानते असे आमदार संजय सावकारे यांच्या पत्नीने म्हटले आहे.