ब्रेकिंग : अभियंत्या सह तीन कर्मचारी लाच घेताना एसीबीच्या ताब्यात, भुसावळ नगरपालिकेत मोठी खळबळ
भुसावळ, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क | भुसावळ नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अभियंता यांचे सह तीन कर्मचाऱ्यांना सहाशे रुपयांची लाच घेताना जळगाव लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ अटक केल्याने नगरपालिकेत मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना आज दिनांक २३ एप्रिल रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली.
अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार हे प्लंबर असून त्याचे प्रत्येक वर्षाला लायसन्स नुतनिकरण करावे लागते. त्या साठी तक्रारदार हे पाणी पुरवठा विभाग भूसावळ येथे गेले असता पाणी पुरवठा विभागातील शाम समाधान साबळे यांनी ७०० रुपये लाचेची मागणी केली होती. त्यानंतर साबळे यांनी पाणी पुरवठा अभियंता सतीश देशमुख यांना कॉल केला असता देशमुख यांनी ६००/- रुपये द्यावे लागतील असे सांगितले. त्यानंतर तक्रारदार हे शाम साबळे. यांचे कडेस लाचेची रक्कम ६००/- रुपये घेवून गेले असता साबळे यांनी पाणी पुरवठा विभागातील लिपिक शांताराम सुरवाडे यांना कॉल करून साहेबांनी ६०० रुपये घेण्यास सांगितले आहे असे सांगून त्यांना लाचेची रक्कम घेण्यास सांगितले.
दरम्यान तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्या नुसार शांताराम सुरवाडे यांना सदरची लाच रक्कम स्विकारली म्हणून त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. या संदर्भात भुसावळ शहर पोलीस स्टेशन मध्ये १)शाम समाधान साबळे, वय- २८ वर्ष, धंदा- नोकरी, नगर पालीका भुसावळ पाणीपुरवठा विभाग. कंत्राटी कामगार. २) सतिष सुरेशराव देशमुख, धंदा-नोकरी, पाणी पुरवठा अभियंता. पाणीपुरवणा विभाग भुसावळ वर्ग ३. ३) शांताराम उर्खडु सुरवाडे , वय ५७ वर्ष धंदा नोकरी लिपीक नेम पाणी पुरवठा विभाग भुसावळ वर्ग ४ यांचेवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सदरची कारवाई पर्यवेक्षण अधिकारी योगेश ठाकूर, पोलिस उप अधिक्षक, ला. प्र. वि. जळगांव. सापळा व तपास अधिकारी श्रीमती नेत्रा जाधव, पोलिस निरीक्षक , सहा पोउपनिरी सुरेश पाटील चालक. सहा पोउपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील. पोहेकॉ शैला धनगर.पोना/ बाळू मराठे, पो. कॉ/राकेश दुसाने,पो.कॉ प्रदिप पोळ यांनी यशस्वी केली.