ब्रेकिंग : राज्यातील शाळांची झाडाझडती, १ आगष्ट ते ३१ आगष्ट दरम्यान शिक्षण विभागाचे महा अभियान
मुंबई, मंडे टू मंडे न्युज नेटवर्क l विद्यार्थी गुणवत्ता विकास महा अभियान अंतर्गत मोहीम सुरू करण्यात आली असुन त्यात पहिली ते बारावी पर्यंतच्या शाळांमधील सुविधा तपासणार आहेत. १ आगष्ट ते ३१ आगष्ट दरम्यान शिक्षण विभागाचे महा अभियान राबविण्यात येत आहे.
या अभियानात या गोष्टी तपासणार आहेत. गणवेशाची उपलब्धता, प्रधान मंत्री पोषण शक्ती योजने अंतर्गत दिल्या जाणाऱ्या भोजनाचा दर्जा, स्वयंपाक गृहाची उपलब्धता, स्काऊट गाईड प्रशिक्षण आणि तासांचे आयोजन, विविध संस्थांनी शासना सोबत केलेल्या कराराबद्दलची अंमलबजावणी, वर्ग खोल्यांची स्थिती, स्वच्छता गृहांची उपलब्धता, अध्यायांबानी अध्यापन साहित्य,शाळांमधील इंटरनेट सुविधा, दप्तराचे ओझे कमी करण्याच्या उपाययोजनांची प्रत्यक्ष स्थिती, आदी गोष्टी या अभियानांतर्गत तपासल्या जाणार आहेत.