भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

ब्रेकिंग : दोन लाचखोर वायरमन एसीबी च्या जाळ्यात, १ लाख रुपयांची लाच मागितली

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l भरारी पथकाने एकूण पाच विज मिटर काढून तुमचे वीज मीटर नादुरुस्त आहे तुमच्यावर जर विज चोरीचा गुन्हा दाखल करायचा नसेल तर एकूण १,५०,०००/- रुपये लागतील अशी मागणी दि.०२/१२/२४ रोजी केली होती.

यातील तक्रारदार हे ३० वर्षीय पुरुष असून ते जळगाव येथील रहिवाशी असून त्या बाबत तक्रारदार यांनी दि. ०३ /१२/२४ रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागा जळगांव येथे समक्ष येऊन तक्रार दिली होती . दि . ३ डिसेंबर २०२४ रोजी तक्रारदाराने दिलेल्या तक्रारी नुसार लाच मागणी पडताळणी केली असता धनराज वायरमन व गोटू वायरमन (पूर्ण नाव माहीत नाही) यांनी एका विज मीटरचे ३० हजार रुपये, याप्रमाणे एकूण १,५०,००० रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती १ लाख रुपये लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. त्या नुसार शनिपेठ पोलीस स्टेशन येथे १) धनराज वायरम पुर्ण नाव माहित नाही. २ ) गोटु वायरमन पुर्ण नाव माहित नाही दोन्ही नेम. मराविवि कं. मर्या. जळगांव यांचेवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.

पर्यवेक्षक अधिकारी योगेश ठाकूर, पोलीस उप अधीक्षक लाप्रवि जळगांव, सापळा अधिकारी पोनि नेत्रा जाधव
लाप्रवि जळगांव, Psi दिनेशसिंग पाटील,पोना ,किशोर महाजन ,बाळू मराठे पोकॉ प्रदिप पोळ,अमोल सुर्यवंशी यांनी ही कारवाई केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!