ब्रेकिंग : पाच हजारांची लाच स्वीकारताना तलठ्यासह दोन पंटर ला रंगेहाथ पकडले
मुक्ताईनगर, मंडे टु मंडे न्युज प्रतिनिधी l सात बारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी सहा हजार रुपये फी भरा नाहीतर मला पाच हजार रुपये द्या. अशी मागणी करत 5000 रुपये स्वीकारताना मुक्ताईनगर तालुक्यातील काकोडा येथील तलाठी प्रशांत प्रल्हाद ढमाळे याना व त्यांच्या दोन पंटर याना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
तक्रारदार हे जळगाव येथील रहिवाशी असून यांचे आजोबा यांचे नावे कुऱ्हा ता. मुक्ताईनगर येथे शेत गट क्र.167/18 असा असुन तक्रारदार यांचे आजोबा हे सन 1997 मध्ये मयत झाले आहे. तेव्हा पासुन तक्रारदार यांचे वडील, काका, आत्या व मयत काकांच्या मुलांचे यांचे 7/12 उताऱ्यावर नाव लावणे बाकी होते. त्यासाठी तक्रारदार यांनी मागील 7 ते 8 दिवसापूर्वी कुऱ्हा गावातील तलाठी प्रशांत प्रल्हाद ढमाळे
याची भेट घेतली असता प्रशांत धमाळे यांनी तक्रारदार यांना तुम्हाला प्रत्येक वर्षाचे 220 रुपये या प्रमाणे 6000 रुपये शासकीय फी भरावी लागेल, जर तुम्हाला शासकीय फी भरायची नसेल तर मला 5000 रुपये द्यावे लागतील असे सांगितले होते त्या बाबत यातील तक्रारदार यांनी दिनांक 01/01/2025 रोजी ला. प्र. वि. जळगांव घटकांकडे तक्रार दिली होती. सदर तक्रारीची दिनांक 01/01/2025 रोजी पडताळणी केली असता तलाठी प्रशांत प्रल्हाद ढमाळे व पंटर अरुण शालीग्राम भोलानकार, यांनी तक्रारदार यांचे 7/12 उताऱ्यावर त्याचे वडील, काका, आत्या व मयत काकाच्या मुलाचे नाव लावण्याचे मोबदल्यात 5000/- लाचेची मागणी केली होती.
त्यानंतर आज दिनांक 08/01/2025 रोजी सदर लाच रक्कम पंटर अरुण शालीग्राम भोलानकार, यांचे सांगणे वरून दुसरा खाजगी पंटर संतोष प्रकाश उबरकर , हा 5000 रुपये लाच रक्कम स्वतः स्विकारताना त्यांना रांगेहाथ पकडण्यात आले असून या बाबत मुक्ताईनगर पोलीस ठाणे येथे 1) प्रशांत प्रल्हाद ढमाळे, वय 42 वर्ष, व्यवसाय – तलाठी, सजा काकोडा ता. मुक्ताईनगर, रा. चिखली रानखांब ता. मलकापूर जि. बुलढाणा ह. मु. गणपती नगर, भाग 5 मलकापूर ता. मलकापूर जि.बुलढाणा (खाते महसूल वर्ग 3)
2 ) अरुण शालीग्राम भोलानकार,वय 32 वर्ष, व्यवसाय खाजगी पंटर, रा. कुऱ्हा ता. मुक्ताईनगर जि. जळगांव (खासगी पंटर)
3) संतोष प्रकाश उबरकर , वय 25 वर्ष, खाजगी इसम रा. कुऱ्हा ता. मुक्ताईनगर जि. जळगांव (खासगी इसम) यांचेवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
सापळा पर्यवेक्षक अधिकारी, योगेश ठाकूर , पोलीस उपअधीक्षक, लाप्रवि जळगांव . सापळा अधिकारी, पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव, GPSI दिनेशसिंग पाटील, पोकॉ/प्रदिप पोळ, पोकॉ/प्रणेश ठाकूर
पोकॉ/सचिन चाटे यांनी केली.