भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

ब्रेकिंग : नगर रचना सहाय्यकाला लाच घेताना अटक, महापालिकेसह जळगाव मध्ये खळबळ

जळगाव, मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l जळगाव मध्ये
बांधकामाचे परवानगीचे व बांधकाम झालेल्या घराचे भोगवटा प्रमाणपत्र देण्याचे तीन प्रकरणा पैकी दोन प्रकरणांसाठी ३० हजारांची मागणी करत पहिल्या प्रकरणासाठी १५ हजारांची लाच स्विकारणाऱ्या जळगाव महापालिकेतील रचना विभागाचे रचना नगररचना सहाय्यक अधिकारी मनोज समाधान वन्नेरे यांना रंगेहात अटक करण्यात असल्याने जळगाव महापालिकेसह जळगांव मध्ये खळबळ उडाली आहे.

यातील तक्रारदार ३४ वर्षीय पुरुष रा. खेडी बु. जि. जळगांव
यांनी बांधकामाचे परवानगीचे व बांधकाम झालेले घराचे भोगवटा प्रमाणपत्र देण्याचे प्रकरण मंजूर करण्यासाठी परवानगी साठी नगर रचना विभाग मनपा जळगांव येथे एकूण ३ प्रकरणे दाखल केली आहेत. त्यात पहिल्या प्रकरणात पडताळणी करण्यासाठी पाठवले असता
मनोज समाधान वन्नेरे यांनी पहिल्या प्रकरणात २१,००० व तडजोड अंती १५,००० व व दुसऱ्या प्रकरणात १५,००० रुपयाची आयुक्त, मनपा जळगाव व सहाय्यक संचालक (अतिरिक्त कार्यभार ) नगर रचना विभाग, मनपा जळगाव यांचेसाठी एकूण ३०,००० हजारांची मागणी करून पहिल्या प्रकरणात १५,००० रुपये आज दिनांक ९ डिसेंबर सोमवार रोजी स्वीकारले. म्हणून मनोज समाधान वन्नेरे, वय ३४ वर्षे, व्यवसाय नोकरी , नगर रचना सहाय्यक, नेम. नगर रचना विभाग, मनपा जळगांव ( वर्ग ३ ) याना अटक करण्यात आली असून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू आहे.

सदरची कारवाई सापळा अधिकारी व तपास अधिकारी
योगेश ठाकूर, पोलीस उपअधीक्षक, लाप्रवि जळगांव.
Psi दिनेशसिंग पाटील, Psi सुरेश पाटील, पोना किशोर महाजन , राकेश दुसाने यांनी केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!