मोठी बातमी! मराठा आरक्षणावरची स्थगिती हटवण्यास सुप्रीम कोर्टाचा तूर्तास नकार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था)। सर्वांचे लक्ष लागून असलेल्या मराठा आरक्षणाची सुनावणी अखेर सर्वोच्च न्यायालयामध्ये पार पडली आहे. आरक्षणावरील अंतरिम स्थगितीबाबत निर्णय घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. अंतिम सुनावणी ही 25 जानेवारी महिन्यात होणार आहे. मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्यास कोर्टाने नकार दिला आहे.
न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती नागेश्वर राव, न्यायमूर्ती हेमंत गुप्ता, न्यायमूर्ती रवींद्र भट तसेच न्यायमूर्ती अब्दुल नजीर यांचा समावेश असलेले घटनापीठापुढे सुनावणी झाली. यावेळी मुकुल रोहतगी युक्तीवाद यांनी युक्तीवाद केला. ‘शैक्षणिक आणि सामाजिक आधारावर मराठा समाजाला आरक्षण देण्याची गरज आहे. नोकरीमध्ये देखील आरक्षण देण्याची गरज असून वर्तमान परिस्थिती बघता मराठा समाजाला आरक्षण देण्याची गरज असल्याचं मुकुल रोहतगी यांनी सांगितले. मात्र मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्यास कोर्टाने नकार दिला आहे. पुन्हा एकदा निराशा पदरी पडली आहे. मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्यास कोर्टाने नकार देत नोकरी भरतीला देखील स्थगिती देण्यात आली आहे.