भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईममहाराष्ट्र

बांधकाम परवानगी साठी आठ लाखांची लाच, महानगरपालिका आयुक्तांसह स्विय सहायक फरार

मंडे टु मंडे न्युज नेटवर्क l बांधकाम परवानगी देण्या साठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासकाने लीपिका मार्फत ९ लाख ३० हजार रुपये लाच मागितली होती. तडजोडी अंती ८ लाख रुपये देणे ठरले. लाच मागणी निष्पन्न झाल्याने महापालिका आयुक्त तथा प्रशासक व लीपिकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून आयुक्त व लिपिक फरार आहेत.सदरची कारवाई ही आज दि.२७ जून गुरुवार रोजी दुपारी करण्यात आली.

अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार हे त्यांचे भागीदारांसह 4K रियाल्टी या नावाने बांधकाम व्यवसाय करतात. त्यांनी अहमदनगर महानगरपालिका हद्दीतील मौजे नालेगाव येथे २२६०.२२ चौरस मीटर प्लॉट खरेदी केलेला आहे. सदर प्लॉटवर तक्रारदार यांना त्यांचे भागीदारांसह बांधकाम करावयाचे असल्याने त्यांनी बांधकामासाठी लागणारी बांधकाम परवानगी मिळण्यासाठी महानगरपालिका कार्यालय अहमदनगर येथे दि. १८.०३.२०२४ रोजी ऑनलाईन अर्ज २५४५३२ या क्रमांकाने केला.

सदर परवानगी साठी डॉ. पंकज जावळे. वय- ४७ वर्षे, पद- आयुक्त तथा प्रशासक महानगरपालिका, अहमदनगर ( वर्ग -१) यांनी लिपिक श्रीधर देशपांडे. वय- ४८ वर्षे, पद- लिपिक टंकलेखक अतिरिक्‍त पदभार स्विय सहायक आयुक्त महानगरपालिका यांच्या मार्फत ९.३०.०००/- रुपये लाचेची मागणी केली असता तक्रारदार यांना डॉ. जावळे आयुक्त आणि त्यांचे स्विय सहाय्यक देशपांडे यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी अँटी करप्शन ब्युरो, जालना कार्यालयाकडे दिनांक १९.०६.२०२४ रोजी तक्रार दिली.

तक्रारदार यांचे तक्रारी वरून आलोसे यांची लाच मागणी पडताळणी दिनांक -१९.०६.२०२४ २०.०६.२०२४ रोजी केली असता लिपिक देशपांडे यांनी तक्रारदार यांच्याकडे मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्या कडून बांधकाम परवानगी मिळवून देण्यासाठी ८.००.०००/- रुपये लाचेची मागणी पंचा समक्ष केली.लाच मागणी पडताळणी दरम्यान मनपा आयुक्त हे देशपांडे यांना तक्रारदार यांच्याकडे लाच मागणी करण्यासाठी प्रोत्साहन देत असल्याचे निष्पन्न झाल्याने आयुक्त डॉ. पंकज जावळे. वय- ४७ वर्षे, पद- आयुक्त तथा प्रशासक महानगरपालिका, अहमदनगर ( वर्ग -१ ) मूळ रा.माजलगाव जि.बीड. सध्या राहणार – शासकीय निवासस्थान ,अहमदनगर. आणि लिपिक श्रीधर देशपांडे
वय- ४८ वर्षे, पद- लिपिक टंकलेखक अतिरिक्‍त पदभार स्विय सहायक आयुक्त महानगरपालिका, अहमदनगर ( वर्ग – ३ ) रा.अहमदनगर. याचे विरुद्ध पोलीस ठाणे तोफखाना जि. अहमदनगर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु असून एसीबी कारवाईची कुणकुण लागताच आयुक्त व लिपिक फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

दरम्यान, लिपिक तथा स्विय सहाय्यक देशपांडे याच्या बुऱ्हाण नगर मधील शासकीय निवास स्थानी एसीबी ने छापा टाकला असून पुढील कारवाई सुरू आहे.

सदरची कारवाई सापळा अधिकारी किरण बिडवे,
पोलीस उप अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो जालना. शंकर मुटेकर, पोलीस निरीक्षक अँटी करप्शन ब्युरो ,जालना. पोलीस अंमलदार गजानन घायवट, शिवाजी जमधडे, गणेश चेके, गणेश बुजाडे , शिवलिंग खुळे, अतिश तिडके, गजानन खरात विठ्ठल कापसे व भालचंद्र बिनोरकर.अँटी करप्शन ब्युरो ,जालना. यांनी केली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!